Soybean Market : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीतच

International Market Soybean Rate : अमेरिकेतील सोयाबीन दरातील तेजी कायम आहे. सोयाबीन दराने तब्बल दोन महिन्यांनंतर १५ डॉलरचा टप्पा गाठला. तर सोयापेंडचेही वायदे ४४० डॉलरवर पोहोचले.
Soybean Market
Soybean MarketAgrowon
Published on
Updated on

Pune News : अमेरिकेतील सोयाबीन दरातील तेजी कायम आहे. सोयाबीन दराने तब्बल दोन महिन्यांनंतर १५ डॉलरचा टप्पा गाठला. तर सोयापेंडचेही वायदे ४४० डॉलरवर पोहोचले. अमेरिकेत पावसाने दडी दिली.

याचा पिकावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने सोयाबीनमध्ये तेजी आली. पण देशातील बाजार मात्र दबावातच आहे. सोयाबीनला ४६०० ते ५१०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

देशातील बाजारात सोयाबीनची आवक वाढतच आहे. राज्यातील लातूर, अकोला, अमरावती आणि नागपूरमधील बाजारांत सोयाबीनची आवक सरासरीपेक्षा जास्त आहे. मध्य प्रदेशातील इंदोर, देवाससह इतर महत्त्वाच्या बाजारांमध्येही आवक जास्तच दिसते. देशात सध्या मध्य प्रदेशातील आवक जास्त आहे. त्यानंतर महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये सोयाबीनची विक्री होत आहे. त्यातही राजस्थानमधील आवक कमी आहे.

Soybean Market
Soybean Market : अकोल्यात सोयाबीनची आवक वाढतीच

गुरुवारी (ता. २२) देशात १ लाख ८० हजार क्विंटलची आवक झाली. यापैकी मध्य प्रदेशात ८५ हजार क्विंटल सोयाबीन आले. तर महाराष्ट्रात ७५ हजार क्विंटलची शेतकऱ्यांनी विक्री केली. राजस्थानमध्ये १२ हजार टन तर इतर राज्यांमध्ये ८ हजार टनांची आवक झाली. सध्या खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यातच सोयाबीनचे भावही दबावात आहेत. त्यामुळे शेतकरी सोयाबीन विकत असल्याचे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत.

तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेतील दुष्काळी स्थितीमुळे सोयाबीन दरात तेजी आली. मध्य पश्चिम अमेरिकेतील इलिनॉय, इंडियाना आणि मिशिगन या राज्यांमधील पिकाला पावसाची गरज आहे. या राज्यांमध्ये मागील तीन आठवड्यांपासून पावसाची उघडीप आहे. काही भागात शेतकऱ्यांनी नुकतेच बियाणे पेरले पण पाऊस नाही.

तसेच उगवलेले पीक पाण्याअभावी वाया जाण्याची शक्यता आहे. आता पाऊस आला तरी उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो, असे शेतकरी सांगत आहेत. कारण ऐन पीक वाढीच्या काळातच पाण्याचा मोठा ताण बसत आहे.

अमेरिकेत उत्पादनात घटीचा अंदाज

अमेरिकेत सोयाबीन उत्पादनात घटीचा अंदाज शेतकरी व्यक्त करत असतानाच दरात मोठी सुधारणा पाहायला मिळाली. बुधवारी सोयाबीनच्या वायद्यांनी १५ डॉलरचा टप्पा पार केला. बुधवारी सोयाबीन १५.१९ डॉलरवर पोहोचले होते.

गुरुवारी दुपारपर्यंत यात काहीशी घट होऊन सीबॉटवर सोयाबीनचे वायदे १५.०७ डॉलरवर होते. पण ब्राझीलचे सोयाबीन बाजारात आल्यानंतर पहिल्यांदाच सोयाबीन १५ डॉलरवर पोहोचले. सोयापेंडचे वायदेही वाढले आहेत. सोयापेंड वायद्यांनी ४४० डॉलरचा टप्पा गाठला. गुरुवारी दुपारी वायदे ४३४ डॉलरवर होते.

Soybean Market
Soybean Seed Supply : ‘महाबीज’कडून ६० हजार क्विंटल सोयाबीनच्या बियाण्याचा पुरवठा

देशात खाद्यतेलाचा आयात साठा मोठा

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे वायदे तेजीत असताना देशात मात्र दर दबावातच आहेत. सोयाबीनला गुरुवारी ४६०० ते ५१०० रुपये दर मिळाला. देशात खाद्यतेलाचा आयात झालेला साठा मोठा आहे.

त्यामुळे देशातच सोयाबीन गाळपापासून मिळणाऱ्या तेलाला जास्त उठाव नाही, तसेच भावही दबावात आहेत. तर सोयाबीनची उपलब्धताही चांगली आहे. सोयापेंडला निर्यातीसाठी मागणीही कमी आहे. त्यामुळे दरात जास्त सुधारणा दिसत नाही, असे अभ्यासकांनी सांगितले.

खरिपात सोयाबीनच्या लागवडीकडे लक्ष

अमेरिकेतील सोयाबीन बाजारातील तेजी पावसावर अवलंबून आहे. पाऊस झाल्यानंतर पिकांची परिस्थिती सुधारल्यास दर पुन्हा कमी होऊ शकतात. त्यामुळे भारतासह इतर देशांच्या बाजाराने अमेरिकेतील तेजीला प्रतिसाद दिलेला नाही.

पण अमेरिकेतील बाजारातील ही तेजी टिकून राहिल्यास भारतासह इतर देशांमध्येही दर वाढतील. तसेच देशात खरिपाच्या पेरण्या लांबल्या आहेत. लागवडीच्या काळात सोयाबीनला कमी भाव मिळतोय. त्यामुळे खरिपात सोयाबीनची लागवड कशी होते, याकडेही बाजाराचे लक्ष असेल, असे अभ्यासकांनी सांगिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com