Lentil Agrowon
ॲग्रोमनी

देशात यंदा विक्रमी मसूर आयात होण्याची शक्यता

जगात कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया मसूर उत्पादनात (Lentil Production) आघाडीवर आहेत. यंदा या दोन्ही देशांमध्येही पीक चांगलं आहे. त्यामुळं या दोन्ही देशांतील मसूर उत्पादन वाढीची शक्यता आहे.

Team Agrowon

पुणेः यंदा कॅनडा आणि ऑस्ट्रेलियात मसूरचे (Lentil) पीक चांगले आहे. या दोन्ही देशांमध्ये यंदा उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळं आंतरारष्ट्रीय बाजारात मसूरचे दर नरमले. परिणामी भारतात यंदा मसूरची विक्रमी आयात होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास तेजीत असलेल्या तुरीच्या दरावर परिणाम होऊ शकतो, असं जाणकारांनी सांगितलं.

जगात कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया मसूर उत्पादनात (Lentil Production) आघाडीवर आहेत. यंदा या दोन्ही देशांमध्येही पीक चांगलं आहे. त्यामुळं या दोन्ही देशांतील मसूर उत्पादन वाढीची शक्यता आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात मसूरचा पुरवठा वाढून दर नरमण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या दोन्ही देशांतून मसूर पुढील दोन आठवड्यांत बाजारात दाखल होईल. त्यामुळे सध्या मसूर दर काही प्रमाणात कमी झालेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मसूरचे दर कमी होत असताना देशात मात्र तुरीचे दर तेजीत आहेत. त्यामुळं यंदा भारताची मसूर आयात वाढण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

मसूरचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होत असून दोन आठवड्यांमध्ये ७२ रुपये प्रतिकिलोवरून ६६ रुपयांपर्यंत नरमले, असं इंडिया पल्सेस अॅन्ड ग्रेन्स असोसिएशनचे अध्यक्ष बिमल कोठारी यांनी सांगितलं. देशातील मसूरचे दर ६० रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. कॅनडामध्ये जवळपास २५ लाख टन मसूरचे उत्पादन होते.

यंदा कॅनडात पीक चांगले आहे. तर दोन महिन्यानंतर ऑस्ट्रेलियातील उत्पादन हाती येईल. ऑस्ट्रेलियात यंदा ८ ते ९ लाख टन मसूर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळं या दोन्ही देशांमधून भारताला मसूरचा पुरवठा वाढेल. परिणामी देशातील मसूरचे दर आणखी कमी होतील, असेही कोठारी यांनी सांगितलं.

देशात मसूरचे दर कमी होत आहेत. ही ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. मात्र पुढील काळात बाजारत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या तुरीसाठी धोकादायक आहे. यंदा देशात तुरीची लागवड कमी झाली. तसंच उत्पादकताही घटण्याची शक्यता आहे. त्यामुळं सध्या तुरीच्या दरात तेजी आली आहे. मात्र मसूर स्वस्त झाल्यानं ग्राहक तुरीऐवजी मसूरला पसंती देतील. याचा फटाक तुरीच्या दाराला बसेल, असंही जाणकारांनी सांगितलं.

सध्या मसूरची आयात मुक्त श्रेणीत आहे. २०२१-२२ मध्ये देशात ६ लाख ६७ हजार टन मसूरची आयात झाली होती. परंतु त्याआधीच्या वर्षात म्हणजेच २०२०-२१ मधील आयात ही ११ लाख १६ हजार टनांवर होती. परंतु यंदा भारतात १२ ते १५ लाख टन मसूर आयात होण्याचा अंदाज व्यापारी वर्गातून व्यक्त होतोय. मागीलवर्षी मसूरचे दर या काळात ९०० डाॅलर प्रतिटन होते. ते सध्या ७६० डाॅलरवर आले. यंदा भारतात मसूरची आयात वाढेल. भारतीय आयातदार कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातील नवीन पिकाची वाट पाहत आहेत, असंही जाणकारांनी सांगितलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT