soyabean agrowon
ॲग्रोमनी

लातूर बाजारात सोयाबीन आवक वाढली

विदर्भातील प्रमुख बाजारांमधील आजचे सोयाबीन बाजार भाव किती आहेत, जाणून घ्या.

Shamika Bavikar

मराठवाड्यातील महत्त्वाच्या सोयाबीन बाजारांपैकी एक असलेल्या लातूर बाजारामध्ये आज 9 एप्रिलला 13023 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणलं गेलं. या मालाचे भाव किमान 7250 रुपये ते कमाल 7479 रुपयांच्या दरम्यान राहिले. तसंच आवक मालाचे सर्वात जास्त व्यवहार 7350 रुपयांनी झालेत. तिकडे उदगीर बाजारात 4300 क्विंटल सोयाबीन आवक झाली. या मालाला किमान 7200 तर कमाल 7260 रुपयांचा दर मिळाला. इथं सर्वसाधारण दर 7230 रुपयांचा राहिलाय. दुसरीकडे तुळजापूर बाजारात सोयाबीनच्या आवक मालाला किमान 7000 रुपये तर कमाल 7350 रुपयांचा दर होता. तर सर्वसाधारण दर 7200 होता. कोला बाजारात सोयाबीनची आज 9 एप्रिलला 1761 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला आज किमान 6800 रुपये तर कमाल 7325 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 7200 हजार रुपयांवर होता.

अकोला बाजारात सोयाबीन आवक वाढली होती. तर नागपूर बाजारात सोयाबीनची 484 क्विंटल आवक झाली असून किमान भाव 6100 रुपये होता. तर कमाल भाव 7420 रुपयांचा मिळालाय. या मालाला सर्वसाधारण 7090 चा भाव मिळालाय. देवणी बाजारात आवक 51 क्विंटल राहिली. यावेळी या सोयाबीनला किमान 6900 रुपये दर मिळाला. तर कमाल व्यवहार 7545 रुपयाने झाले. सरासरी दर 7222 रुपये मिळाला. तसेच देऊळगाव राजा बाजारातील आवक 30 क्विंटलवर होती. यावेळी सोयाबीनला 6800 रुपये दर मिळाला. तर कमाल दर 7000 रुपयांवर होते. तर जास्तीत जास्त आवक मालाला सर्वसाधरण दर 6900 रुपये मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर: दोन टप्प्यांत मतदान, १४ नोव्हेंबरला मतमोजणी

Soybean Harvesting : सोयाबीन सोंगणीवेळी हातमोजे वापराचे प्रात्यक्षिक

Solapur Flood : पूर ओसरताच दिसू लागले उसाचे चिपाड

Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी

Nagarparishad Nagarpanchayat Reservation : २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

SCROLL FOR NEXT