kanda bajar bhav Agrowon
ॲग्रोमनी

Onion Rate : कांदा बाजाराचे अंदाज का चुकले?

देशातून कांदा निर्यातही सुरु आहे. सध्या भारताला शेजारच्या देशांना निर्यातीसाठी कमी खर्च येतोय.

Team Agrowon

Pune Onion News : खरिपात कांदा लागवड (Onion Cultuvation) घटल्याची चर्चा बाजारात सुरु होती. त्यामुळं यंदा कांद्याला चांगला भाव (Onion Bajarbhav) मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता.

पण बाजारात कांद्याची आवक (onion Arrival) सुरु झाली आणि बाजारभाव चार वर्षातील निचांकी पातळीवर पोचले. दुसरीकडं निर्यातही चांगली सुरु आहे. तरीही कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत आहे.

एरवी फेब्रुवारीच्या मध्यात कांद्याला बऱ्यापैकी दर मिळत असतो. पण यंदा दरात मोठी घट झाली. सध्या कांद्याला सरासरी ७०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. या दरात उत्पादन खर्चही वसूल होत नाही, असं शेतकरी सांगतात.

आशियातील सर्वात मोठ्या कांदा मार्केटमध्ये सध्या सरासरी ७०० रुपये दर मिळतोय. मागील हंगामात याच काळात २ हजार ४०० रुपये दर होता. तर २०२१ मध्ये ३ हजार ८०० आणि २०२० मध्ये २००० रुपये भाव होता. म्हणजेच यंदा कांदा दर निम्मेही नाहीत.

विशेष म्हणजे खरिपातील लागवडी यंदा घटली असून उत्पादन कमी राहील, असा अंदाज काही जाणकार व्यक्त करत होते. त्यामुळं शेतकऱ्यांना खरिपातील कांद्याला चांगला भाव मिळेल, अशी आशा होती. पण बाजारात कांद्याची आवक सुरु झाली आणि दबाव वाढत गेला.

बाजारात अचानक आवक वाढली. त्यामुळं अनेकांचे अंदाज चुकले. अॅगमार्कनेटवरील माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यात दरम्यान देशातील बाजारात जवळपास ११ लाख टन कांदा आवक झाली. तर मागीलवर्षी याच काळातील आवक ९ लाख टनांच्या दरम्यान होती.

बिझनेसलाईननं दिलेल्या वृत्तानुसार, यंदा महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकसह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही लागवड वाढली.

त्यामुळं बाजारात आवकेचा दबाव निर्माण झाला. इतर राज्यांमध्येही कांदा उत्पादन वाढल्यानं महाराष्ट्रातून कांद्याचा उठाव कमी होतोय. याचा दरावर आणखी दबाव येतोय.

निर्यात वाढली

दुसरीकडं देशातून कांदा निर्यातही सुरु आहे. सध्या भारताला शेजारच्या देशांना निर्यातीसाठी कमी खर्च येतोय. त्यातच सध्या कांदा दर कमी असल्यानं निर्यात वाढली. भारताचा गुणवत्तेचा कांदा २५० ते २६० डाॅलर प्रतिटनाने मिळतोय.

तर लहान आकाराचा कांदा १८० डाॅलर प्रतिटनानं निर्यात होतोय. जानेवारीपर्यंत कांद्याची किती आवक झाली याची माहिती अद्याप उपलब्ध नाही. मात्र गेल्याकाही वर्षांतील विक्रमी निर्यात असू शकते, अशी माहिती कांदा बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

आवक कमी होण्याचा अंदाज

कांदा निर्यात यंदा वाढली तरी आवकेच्या दबावामुळं देशातील दर दबावात आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि पश्चिम बंगालव्यतिरिक्त लागवड वाढल्याचा अंदाज यंदा अनेकांना बांधता आला नाही. त्यामुळं कांदा दरावर दबाव आला.

मात्र मार्च महिन्यात आवक कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं कांदा दरही सुधारू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT