Kanda Bajarbhav : कांदा उत्पादक शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना लिहिले रक्ताने पत्र

सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटले आहेत. सोशल मीडियावर कांदा अग्निडाग समारंभाची एक निमंत्रण पत्रिका चांगलीच व्हायरल होऊ लागली आहे.
Kanda Bajarbhav
Kanda Bajarbhav Agrowon
Published on
Updated on

Onion Rate : कांदा दरावरील दबावानंतर राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

यंदा होळीच्या सणानिमित्त कांदा अग्निडाग समारंभ कार्यक्रम कांदा उत्पादक शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी आयोजित केला आहे.

"६ मार्च २०२३ रोजी होळीचा दिवशी कांद्याची होळी करण्याचा कार्यक्रम आहे, तरी महाराष्ट्रातील तमाम शेतकरी मित्रांनी या कार्यक्रमास आवर्जून हजर रहावे, शेतकरी म्हणून सर्वच शेतकऱ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवाल अशी अपेक्षा करतो," असा संदेश त्यांनी शेतकऱ्यांना पाठवला आहे. तसेच या पत्रिकेसोबत डोंगरे यांनी रक्ताने पत्र लिहिले आहे.

सोशल मीडियावर कांदा अग्निडाग समारंभाची निमंत्रण पत्रिका व्हायरल होऊ लागली आहे.

शेतकरी कृष्णा भगवान डोंगरे यांनी ही निमंत्रण पत्रिका तयार केली आहे. त्यांच्या नगरसुल मातुलठाण रोड ता. येवला जि नाशिक येथे ६ मार्च रोजी कांदा जाळण्याचा समारंभ घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी या पत्रिकेत लिहिले आहे.

हुबेहूब लग्न पत्रिकेसारखे तयार केलेल्या या निमंत्रण पत्रिकेतून केंद्र आणि राज्य सरकारबद्दल रोष व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या पत्रिकेची चांगली चर्चा सध्या सोशल मिडियावर सुरू आहे.

या निमंत्रण पत्रिकेची दखल लोकप्रतिनिधिकडून घेण्यात येत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर ही निमंत्रण पत्रिका शेयर केली आहे. "सर्व शेतकरी बांधवांना आग्रहाचे निमंत्रण!" अशा ओळीही लिहिल्या आहेत.

पत्रिकेच्या वरील बाजूस 'राक्षसाय नम;' 'भाजप प्रसन्न' लिहून त्याखाली "आमच्या येथे श्री नरेंद्र साहेबांच्या कृपेने

चि. कांदा

शेतकऱ्यांना खड्यात गाडून टाकणारा

सर्वच शेतकऱ्यांचा लाडका कांदा यांचा अग्निडाग समारंभ" असेही लिहिले आहे. त्यासोबतच कुटुंबातील सदस्य आणि

Onion Rate
Onion Rate Agrowon

या निमंत्रण पत्रिकेत प्रमुख उपस्थिती म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय आरोग्य कुटूंब कल्याण राज्य मंत्री भारती पवार यांच्या नावाचा उल्लेखही करण्यात आला आहे.

तसेच महाराष्ट्रातील माध्यमसंस्थांनया आणि शेतकरी संघटनेला याद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

Kanda bajarbhav crisis
Kanda bajarbhav crisis

दरम्यान, मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दर दबावात आहेत. सध्या राज्यातील प्रमुख बाजारपेठेत कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल ४०० ते १००० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे.

त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हैराण आहेत. सध्या लेट खरीप कांद्याची आवक बाजारात वाढली आहे. मात्र कांद्याला सध्या कवडीमोल दर मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com