Soybean Market Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : असा वाढत गेला सोयाबीनवर दबाव ! हंगामातील निचांकी भाव

Soybean Production : देशातील बाजारात सध्या सोयाबीनचे भाव दबावातच आहेत. शेतकरी मागील तीन महिन्यांपासून दरात सुधारणा होण्याची वाट पाहत आहेत. पण सोयाबीनच्या भावात वाढ झाली नाही. परिणामी सोयाबीन उत्पादनक अडचणीत आले.

Anil Jadhao 

Soybean Rate Update : देशातील बाजारात सध्या सोयाबीनचे भाव दबावातच आहेत. शेतकरी मागील तीन महिन्यांपासून दरात सुधारणा होण्याची वाट पाहत आहेत. पण सोयाबीनच्या भावात वाढ झाली नाही. परिणामी सोयाबीन उत्पादनक अडचणीत आले.

ब्राझीलमध्ये विक्रमी उत्पादन झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजार दबावात आला. तर खाद्यतेलाचे भाव पडल्याचाही परिणाम दरावर जाणवत आहे. त्यातच केंद्राने रिफाईंड सोयाबीन आणि सूर्यफुल तेल आयात शुल्कात कपात केली.

माॅन्सूनही यंदा लांबला. अनेक भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. यामुळे गेल्या हंगामात सोयाबीनला ७ ते ८ हजार रुपये भाव पाहिल्यानंतर यंदाही दरात अशीच वाढ होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मागील हंगामात मार्च महिन्यानंतर सोयाबीन भावात सुधारणा झाली होती.

मार्चपर्यंत भावपातळी ५ हजार रुपयांच्या दरम्यान होती. मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी जवळपास ८० टक्के सोयाबीन विकले होते. सहाजिकच तेजीचा फायदा अगदी बोटावर मोजण्याएतक्या शेतकऱ्यांनाच मिळाला.

मागील हंगामात कमी भावात सोयाबीन विकल्यानंतर दरात तेजी आल्याचे पाहून, यंदा शेतकऱ्यांनी मार्चनंतर सोयाबीन विकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये सोयाबीन आवक अपेक्षेपेक्षा कमीच राहीली.

ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये एक तृतियांश म्हणजेच ५० लाख टनांची आवक झाली. मागील हंगामात याच काळातील आवक ४० लाख टन होती. सहाजिकच यंदाची आवक जास्त दिसत होती. पण गेल्या हंगामात उत्पादन आणि आधीचा शिल्लक साठा मिळून १२६ लाख टनांचा पुरवठा होता.

पण चालू हंगामात गेल्यावर्षीपेक्षा तब्बल २८ लाख टनांनी जास्त पुरवठा राहीला. उत्पादन १२४ लाख टन आणि मागील हंगामातील शिल्लक २५ लाख टन असे एकूण १५४ लाख टनांचा पुरवठा झाला.

मागील हंगामातील शिल्लक सोयाबीन हंगामाच्या सुरुवातीलाच बाजारात येईल, असे वाटत होते. पण तसे झाले नाही. त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळातील सोयाबीन आवक कमीच होती.

पण यंदा आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीन उत्पादनात वाढ झाली. अर्जेंटीनात उत्पादन घटले पण ब्राझीलने मोठी झेप घेतली. ब्राझीलमध्ये यंदा १ हजार ५०० लाख टन उत्पादन झाले. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आलेली तेजी ब्राझीलचे सोयाबीन बाजारत आल्यानंतर गायब झाली. ब्राझील सोयाबीनचे गाळप खूपच कमी करतो.

ब्राझील थेट सोयाबीन निर्यातीला जास्त प्राधान्य देत असतो. ब्राझीलच्या सोयाबीनचा मुख्य ग्राहक आहे चीन. चीनने यंदा ९०० लाख टनांपेक्षा अधिक आयातीचे उद्दीष्ट ठेवले आहे. यापैकी जास्तीत जास्त सोयाबीन ब्राझीलमधून आयात केले जाणार आहे.

ब्राझीलचं आंतरराष्ट्रीय बाजारात आल्यानंतर सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव पडले. १५ डाॅलरच्यवर असलेलं सोयाबन १४ डाॅलरपेक्षा कमीच राहीलं. मागल दोन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव १३ ते १४ डाॅलर प्रतिबुशेल्सच्या दरम्यानच फिरत आहेत.

तर ५०० डाॅलरचा टप्पा गाठलेल्या सोयापेंडने मागील दोन महिन्यात क्विचितच ४०० डाॅलरचा टप्पा गाठला. सोयापेंडचे भाव ३०० ते ४०० डाॅलरच्या दरम्यानच आहेत. सहाजिकच आंतरराष्ट्रीय बाजारातील नरमाईचा देशातील बाजारावर दबाव आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT