Chana Sowing
Chana Sowing  Agrowon
ॲग्रोमनी

Chana Sowing : हरभरा पेरणीचा वेग जास्तच

Team Agrowon


पुणेः देशात रब्बी हंगामात (Rabi Season) यंदा हरभऱ्यासह कडधान्याचा पेरा (Pule Sowing) कमी राहू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र सध्या पेरणी काहीशी जास्त दिसत असली तरी वेग कमी झालेला दिसत आहे. रब्बी हंगामात कडधान्य उत्पादकांचे लक्ष हरभरा पिकाकडे जास्त आहे.

देशातील रब्बी पेरणी सध्या वेगाने सुरु आहे. परतीच्या पावसामुळे पेरणीला उशीर झाला, मात्र पेरणीसाठी पुरेसा ओलावा जमिनीत होता. त्यामुळं देशातील पेरणीचा वेग गेल्यावर्षीपेक्षा काहीसा जास्त आहे. पण यंदाच्या रब्बीत कडधान्याचा पेरा कमी राहण्याची शक्यता अगदी सुरुवातीपासून व्यक्त केली जात होती. पण यंदा रब्बी पेरणीत दोन महत्वाच्या पिकांकडे सर्वांचं लक्ष आहे. एक म्हणजे मागील वर्षभरापासून सतत तेजीत असलेला गहू, आणि दुसरं म्हणजे सतत मंदीत असेलला हरभरा.

देशात २३ डिसेंबरपर्यंत कडधान्याची पेरणी जवळपास ३ टक्क्यांनी अधिक आहे. आत्तापर्यंत देशात १४८ लाख ५४ हजार हेक्टरवर कडधान्याचा पेरा झाला होता. मात्र मागील हंगामात याच काळातील पेरणी १४४ लाख ६४ हजार हेक्टरवर होता. म्हणजेच यंदा जवळपास ४ लाख हेक्टरने पेरा जास्त झाला.

हरभऱ्याला मागील वर्षभर कमी दर मिळला. त्यामुळं शेतकरी यंदाच्या रब्बीत हरभऱ्याचा पेरा कमी करण्याची शक्यता आहे. पण सध्या गेल्यावर्षीऐवढाच पेरा झाल्याचं दिसतं. गेल्यावर्षी २३ डिसेंबरपर्यंत देशात १०२ लाख ६५ हजार हेक्टरवर हरभरा पीक होतं. तर यंदा याच तारखेपर्यंत १०३ लाख ३७ हजार हेक्टरवर हरभरा लागवड झाली. म्हणजेच सध्या केवळ ७० लाख हेक्टरवरनं क्षेत्र जास्त आहे. पण अद्याप हरभरा पेरा पूर्ण झालेला नाही.


काय आहे अंदाज?
मागील वर्षभर दर दबावात असल्यानं शेतकरी हरभऱ्याचा पेरा कमी करु शकतात. तुरीच्या बाबतीत यंदा हाच अनुभव आला. तुरीचे दर सरकारनं वर्षभर दबावात ठेवल्यामुळं शेतकऱ्यांनी खरिपात तूर लागवड केमी केली. त्याचा परिणाम आता तूर बाजारावर जाणवतोय. हरभऱ्याच्या बाबतीतही हेच घडू शकतं, असा अंदाज सध्यातरी व्यक्त केला जात आहे. यंदा हरभरा उत्पादनक गहू आणि इतर कडधान्य तसेच तेलबिया पिकांकडे वळाल्याचे सांगितले जाते.


दरपातळी काय राहील?
मात्र शेवटी हरभरा पेरणी किती होते? उत्पादन किती मिळते? यावर सर्व गणित अवलंबून आहे. सध्या देशातील बाजारात हरभऱ्याला सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. हा दर हरभरा लागवडीचं चित्र स्पष्ट होईपर्यंत कायम राहू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT