Cotton Market
Cotton Market Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : कापूस बाजाराचा आजही शेतकऱ्यांना दिलासा

Anil Jadhao 

अनिल जाधव
पुणेः कापूस दराने (Cotton Rate) सलग दुसऱ्या दिवशी चांगली चाल केली. आंतरराष्ट्रीय बाजारानेही (International Market) २०२२ मध्ये शेवटच्या दिवशी कमी झालेली दरपातळी सावरली. आज कापूस दरात दोन टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली होती. तर देशातही आज शेतकऱ्यांना अपेक्षित चित्र होतं. आजही काही बाजारत कापूस दर वाढले होते.     

आंतरराष्ट्रीय बाजारात आज कापूस दरात सुधारणा झाली होती. चीनची वाढलेली मागणी आणि भारतीय बाजारपेठांमध्ये मर्यादीत कापूस आवक याचा बाजाराला आधार मिळतोय. तसंच यंदा जागतिक कापूस उत्पादन कमी राहण्याचा अंदाजही काही संस्था व्यक्त करत आहेत.

त्यामुळंही कापसाचे दर वाढले. पण चालू हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस भाव एक पातळीपेक्षा वाढलेले नाहीत. ऑक्टोबर महिन्यात फक्त एकदा कापूस दरानं ९५ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला होता. रुपयात दर १७ हजार ३४० रुपये प्रतिक्विंटल होतो.

त्यानंतर कापूस दर कमी होत गेले. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कापसाचे दर ८० ते ८८ सेंटच्या दरम्यान राहीले. म्हणजेच १४ हजार ६०० ते १६ हजार रुपये क्विंटल दर मिळाला. पण ३१ डिसेंबरला कापूस बाजार ८३ सेंटवर बंद झाला होता.

मात्र नव्या वर्षात कापसाचे व्यवहार सुरु झाले ते उमेदीनंच. आज कापूस दर जवळपास २ टक्क्यांनी वाढले. आज कापसाचे दर सरासरी ८५ सेंटवर होते. रुपयात हा दर १५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल होतो.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर टिकून राहू शकतात, अशी शक्यता आहे. त्यामुळं या दरवाढीचा आधार देशातील कापूस बाजारालाही मिळेल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत.

देशातील आजची दरपातळी देशात आज कापसाला सरासरी ८ हजार ३०० ते ८ हजार ९०० रुपये दर मिळाला. कालच्या तुलनेत आज काही बाजारांमध्ये कापूस दर सरासरी १०० ते २०० रुपयांनी वाढले होते.

मात्र अनेक बाजारांतील दरपातळी आज स्थिर होती. काही बाजारांमध्ये किमान दर ७ हजार हजारांपासून सुरु होते. तर कमाल दराने ८ हजार ५०० रुपयांचा टप्पा पार केलाय.

राज्यातील दरपातळी राज्यातील बाजारात कापसाची आवक आज काहीशी कमी झाली होती. कालच्या तुलनेत आज बाजारात कापूस कमी आल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

राज्यातील कमाल दरही आता ८ हजार ९०० रुपयांवर पोचला. तर सरासरी दरपातळी ८ हजार २०० ते ८ हजार ५०० रुपये होती.

चालू महिन्यात काय दर मिळतील? चालू महिन्यात कापसाचे दर पूर्वपातळीवर येऊ शकतात. कापसाला ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतात. फक्त सरकारनं यात खोडा घालायला नको. सध्या सरासरी दरही ८ हजार ५०० रुपयांच्याजवळ पोचले.

त्यामुळं आर्थिक विवंचणेत अडकलेले आणि कापूस विक्रीचा निर्णय घेतलेले शतेकरी या दरात विक्री करू शकतात. मात्र कापूस विक्रीपुर्वी बाजारभावाचा आढावा घ्यावा, असं आवाहन जाणकारांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT