GST  Agrowon
ॲग्रोमनी

GST On Food: केंद्राच्या ‘त्या’ निर्णयाचा पाच कोटी व्यवसायिकांना फटका

ऑल इंडिया दालमिल असोसिएशनने अर्थमंत्री निर्मला सीतारामण, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना या संदर्भाने पत्र लिहिले आहे.

ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूरः नॉन ब्रँडेड खाद्यान्न तसेच डाळींवर जीएसटी (GST) लावण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा सर्वच स्तरातून निषेध आणि विरोध आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे पाच हजारांवर छोटे व्यापारी बाजाराबाहेर जातील, अशी भीती व्यक्‍त करीत डाळ मिल असोसिएशनने हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली आहे.

ऑल इंडिया दालमिल असोसिएशनने अर्थमंत्री निर्मला सीतारामण, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना या संदर्भाने पत्र लिहिले आहे. त्यानुसार, भारत सरकारने नॉन ब्रँडेड डाळी तसेच इतर खाद्यान्नावर सोमवारपासून (ता. १८) पाच टक्‍के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय छोट्या व्यापाऱ्यांसाठी मारक आहे. त्यामुळे तो तत्काळ मागे घ्यावा. यामुळे देशातील उद्योगधंद्यांची वाट लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१७ मध्ये संसदेच्या विशेष अधिवेशनात मार्गदर्शन केले होते. त्या वेळी त्यांनी रोजच्या गरजेचे खाद्यान्न तसेच डाळींना करमुक्‍त ठेवण्याची घोषणा केली होती. अवघ्या चारच वर्षांत केंद्र सरकार आपल्या धोरणापासून बदलत व्यापारी विरोधी भूमिका घेत आहे. केंद्राच्या पाच टक्‍के जीएसटी आकारण्यामुळे देशात महागाई (Inflation)वाढेल. केंद्र सरकारकडून यापूर्वी नोंदणीकृत ब्रँडेड खाद्यान्नावर जीएसटी आकारला जात आहे.

आता नॉन ब्रँडेड खाद्यान्नावरदेखील जीएसटी आकारल्यास खाद्यान्नाचा व्यापार टप्प्याटप्प्याने कमी होईल. देशातील ८५ टक्‍के छोटे-छोटे उद्योग व्यापारी हे ब्रँडेड व नॉन ब्रँडेड खाद्यान्नाचा व्यापार करतात. त्यांचे अस्तित्वच केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे धोक्‍यात येणार आहे.

तब्बल पाच कोटी व्यावसायिकांना याचा फटका बसेल, अशी भीती दालमिल असोसिएशनने वर्तविली आहे. मोठ्या कंपन्यांचा एकाधिकार यामुळे वाढून सामान्य ग्राहकांचे हक्‍क संपुष्टात येतील व शोषण वाढेल. परिणामी केंद्र सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी आहे.

केंद्र सरकारच्या पाच टक्‍के जीएसटी आकारणीच्या घोषणेमुळे ८५ टक्‍के व्यापारी प्रभावित होतील. परिणामी, हा निर्णय मागे घेतला पाहिजे. अन्यथा पाच कोटी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येईल. मोठ्या कंपन्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरिता हे षड्‍यंत्र आहे.
सुरेश अग्रवाल, अध्यक्ष, ऑल इंडिया डाळ मिल असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

Kharif Season Planning: निविष्ठांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी अचूक नियोजन करा : पालकमंत्री फुंडकर

Vidarbha Heat Wave: विदर्भातील तीन जिल्ह्यांत अति उष्णतेची लाट; मध्य महाराष्ट्रातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Banana Variety Selection: कमी पावसातील लागवडीसाठी केळीचा कंद निवडताना काय तपासावे?

SCROLL FOR NEXT