Ethanol Production Agrowon
ॲग्रोमनी

Ethanol Production: इथेनॉलकडे साखर वळवण्याचे प्रमाण चार वर्षांत अकरापट

साखर उत्पादनाबरोबरच (Sugar Production) निर्यातीतही (Sugar Export) जोरदार मुसंडी मारताना देशाने उत्पादनात पहिला तर निर्यातीत दुसरा क्रमांक पटकावला आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

कोल्हापूर : केंद्राने गेल्या चार वर्षांत इथेनॉल निर्मितीसाठी (Ethanol Production) जोरदार प्रयत्न केले. त्यामुळे इथेनॉलसाठी साखर वापरण्याचे प्रमाण गेल्या चार वर्षांत तब्बल दहा पटींनी वाढले आहे. २०१८-१९ ला केवळ ३ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वापरली जात होती. २०२१-२२ ला ३५ लाख टन साखर त्यासाठी वापरण्यात आल्याची माहिती केंद्राने दिली आहे. साखर उत्पादनाबरोबरच (Sugar Production) निर्यातीतही जोरदार मुसंडी मारताना देशाने उत्पादनात पहिला तर निर्यातीत दुसरा क्रमांक पटकावला आहे.

ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक अन्न मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अलीकडे साखरेची निर्यात आणि इथेनॉलनिर्मितीसाठी साखरेचा वापर यामुळे साखरेच्या मागणी आणि पुरवठ्यामधील संतुलन राखण्यात आणि देशांतर्गत साखरेच्या किमती स्थिर ठेवण्यास मदत झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील साखरेचे उत्पादन देशांतर्गत वापरापेक्षा सातत्याने जास्त होत असून, त्यामुळे अतिरिक्त साखरेची निर्मिती झाली आहे.

ऑक्टोबरच्या मध्यापासून पुढील हंगाम

उसाचे गाळप साधारणपणे ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते; मात्र उसाच्या पुरेशा उपलब्धतेमुळे, येणाऱ्या साखर हंगामात उसाचे गाळप ऑक्टोबरच्या पहिल्या ते तिसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर २०२२ च्या मध्यापासून नवीन साखर बाजारात येण्यास सुरुवात होईल.

त्यामुळे आगामी साखर हंगामात ६० लाख टन साखरेचा साठा खुला करणे साखरेचे देशांतर्गत भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसे असेल, असे केंद्राला वाटते. यंदाच्या हंगामात शंभर लाख टन साखर निर्यात झाल्याने यातून ३३००० कोटी रुपये कारखान्यांना मिळाले. केंद्र आणखी १२ लाख टन साखर निर्यातीला परवानगी देण्याची शक्यता आहे. यामुळे ही रक्कम ३६००० कोटींवर जाईल. यामुळे ४ ऑगस्टअखेर असणारी ९७०० कोटी रुपयांची शेतकऱ्यांची थकबाकी देणे कारखान्यांना सुलभ होईल, असे केंद्राने म्हटले आहे.

निर्यातीने गाठला १०० लाख टनांचा टप्पा

देशात १ ऑगस्ट २२ अखेर १०० लाख टन साखर निर्यात झाली. देशात साखरेची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी मेच्या शेवटच्या आठवड्यात साखर निर्यातीवर निर्बंध लावले होते. जूनमध्ये दहा लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली होती. यामुळे १०० लाख टनांची साखर निर्यात होऊ शकली. केंद्राने साखर निर्यातीत हस्तक्षेप केल्यानेच देशांतर्गत पातळीवर किरकोळ बाजारात साखरेचे दर नियंत्रित राहिल्याचा दावा केंद्राने केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cooperative Institute : सभासदांना १८ टक्के लाभांश देणार ः ठोंबरे

Rain Crop Damage : शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा गेल्या ‘पाण्यात’

Azolla Cultivation: अझोलाचे उत्पादन कसे करावे?

Indian Agriculture 2025: थंडी यंदा रब्बी पिकांना असह्य होण्याचा धोका; IMDच्या अपडेटनंतर ICAR अलर्टवर!

APMC Farmer Facility : शेतीमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवणाचे पास ः सूर्यकांत पाटील

SCROLL FOR NEXT