Chana  Agrowon
ॲग्रोमनी

‘नाफेड’अंतर्गत हरभरा खरेदी सुरू करावी

शेतकरी संघटनेची मागणी ः समुद्रपूर परिसरातील शेतकऱ्यांची अडचण

टीम ॲग्रोवन

समुद्रपूर, जि. वर्धा ः सुरू हंगामात नाफेडअंतर्गत (NAFED) हरभरा खरेदी (Chana Procurement) सुरू होती. ती खरेदी २३ मे पासून बंद करण्यात आली. त्यामुळे हरभरा खरेदी (Chana Market) पूर्वरत सुरू करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उल्लास कोटमकर आणि शिष्टमंडळाने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले.

समुद्रपूर कृषी उत्पन्न समितीअंतर्गत एक हजार ७७७ शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंद केली आहे. यातील ७९३ शेतकऱ्यांचा हरभरा आतापर्यंत बाजार समितीने खरेदी केला असला तरी तब्बल ९८४ शेतकरी हरभरा विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे तातडीने शासकीय खरेदी प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तहसीलदारांना निवेदन देतेवेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उल्लास कोटमकर, जीवन गुरनले, कवडू कोटमकर, अरुण लढी, डॉ. हेमंत इसनकर, अजाब राऊत, दिनेश निखाडे, सुनील हिवसे यांची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief Proposal: राज्याचा १५ हजार कोटींचा दुष्काळ मदत प्रस्ताव; कृषिमंत्री भरणेंची माहिती

Rain Forecast: चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात पावसाची शक्यता

MAGNET Projects Delayed: चार वर्षांपासून ‘मॅग्नेट’चे प्रकल्प कागदावरच; पूर्व विदर्भात एकही प्रकल्प सुरू नाही

Finance Company Vandalism: फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; नांदेडमध्ये सक्तीच्या वसुलीविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक

NDRF Assistance Norms: एनडीआरएफच्या मदतीच्या निकषांत केंद्र सरकारकडून वाढ; आपत्तीग्रस्तांना दिलासा

SCROLL FOR NEXT