Oil Seed Meal  Agrowon
ॲग्रोमनी

Soya Meal Export : सोयाबीनचे दर कमी झाल्याने वाढली सोयापेंड निर्यात

Soybean Rate : देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात उचांकावरून मोठी नरमाई आली आहे. यामुळे भारताची सोयापेंडही स्वस्त झाली.

Team Agrowon

Soybean Bajarbhav : देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात उचांकावरून मोठी नरमाई आली आहे. यामुळे भारताची सोयापेंडही स्वस्त झाली. त्यामुळे तेलबिया पेंड निर्यात एप्रिल महिन्यात विक्रमी ४८ टक्क्यांनी वाढली, असे साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एसईएने स्पष्ट केले.

एसईएच्या ताज्या आकडेवारीनुसार देशातून एप्रिल महिन्यात जळपास ५ लाख टन तेलबिया पेंड निर्यात झाली. मागीलवर्षी याच महिन्यातील निर्यात ३ लाख ३२ हजार टन होती. या निर्यातीत सोयापेंड निर्यातीचा वाटा मोठा होता.

भारताने एप्रिल महिन्यात १ लाख ७७ हजार टन सोयापेंड निर्यात केली. मागीलवर्षी याच महिन्यातील सोयापेंड निर्यात केवळ २५ हजार टन झाली होती. म्हणजेच यंदाची निर्यात सात पचीने अधिक झाली.

देशातील सोयाबीनचे भाव चालू हंगामात मोठ्या प्रमाणात कमी झाले. मागीलवर्षी एप्रिल महिन्यात सोयाबीनला सरासरी ७ हजार ६०० रुपयांचा भाव मिळत होता. पण चालू हंगामातील भाव सरासरी ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहे.

सोयाबीनचे भाव कमी झाल्यामुळे सोयापेंडचेही भाव कमी झाले आहेत. यामुळे देशातून सोयापेंड निर्यातीला गती मिळाली. अर्जेंटीनाचे सोयाबीन सध्या ५१६ डाॅलर प्रतिटन पडत आहे. तर भारताच्या सोयापेंडचे दर ५७० डाॅलर प्रतिटन आहेत.

आग्नेय आशियातील देश भारतीय सोयापेंडचे मुख्य ग्राहक आहेत. तसेच या देशांना निर्यातीसाठी वाहतूक खर्च कमी लागतो. तसेच डाॅलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य कमी होत असल्याचाही फायदा भारताला मिळत आहे.

एप्रिल महिन्यात भारतातून अडीच लाख टन मोहरी पेंड निर्यात झाली. मागीलवर्षीच्या एप्रिलमधील मोहरीपेंड निर्यात २ लाख २९ हजार टन झाली होती. मागील संपूर्ण हंगामाचा विचार करता भारताने विक्रमी २३ लाख टन मोहरी पेंडची निर्यात केली.

भारतात मोहरी पेंडचे दर कमी असल्याने देशातून निर्यात वाढली होती. मोहरीचे दर हमीभावापेक्षा कमी होते. हमीभाव ५ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल असताना बाजारात केवळ ५ हजार १०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत होता.

देशातील बाजारात सोयाबीन आणि मोहरीचे दर कमी झाल्यामुळे पेडेचे दरही कमी झाले. परिणामी भारताची सोयापेंड आणि मोहरीपेंड आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त पडत होते. यामुळे मागणी वाढून निर्यातही वाढली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT