अकोल्यात तुरीला प्रतिक्विंटल पाच हजार रुपये दर
अकोल्यात तुरीला प्रतिक्विंटल पाच हजार रुपये दर 
ॲग्रोमनी

Arhar Market: नव्या तुरीला काय दर मिळतोय ?

Anil Jadhao 

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही बाजारांमध्ये सध्या नव्या तुरीची आवक (Tur Arrival) होत आहे. मात्र नव्या मालामध्ये ओलावा जास्त आहे. सध्या आवक कमी असली तरी पुढील काही दिवसांमध्ये आवक वाढण्याचा अंदाज आहे. सध्या तुरीला काय दर मिळत आहे? सोयाबीन (Soybean) आणि कापसाप्रमाणे (Cotton) तुरीलाही हमीभावापेक्षा जास्त दर मिळेल का? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

1. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सुधारले

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीनचे दर १४.५९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. मात्र देशातील बाजारात आजही संमिश्र चित्र होते. दुपारपर्यंत देशातील बाजारांत सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये क्विंटल दर मिळाला. तर आवक स्थिर होती. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर सुधारत आहेत. त्याचा आधार देशातील सोयाबीनला मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

2. कापसाचे दर कायम

देशातील कापसाचे दर सध्या यंदाच्या उच्चांकी दरपातळीवरून नरमले आहेत. सध्या कापसाला सरासरी ८ हजार ४०० ते ९ हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे. उत्तर भारतातील बाजारात आजही तुलनेत जास्त दर होते. तर महाराष्ट्रातील दर काहीसे स्थिर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात आज कापसाचे दर काहीसे नरमले होते. चालू महिन्यात देशातील कापसाचे दर दबावात असले तरी पुढील महिन्यापासून दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.  

3. गव्हाचे दर आणखी वाढणार

मागील चार महिन्यांमध्ये गव्हाचे दर प्रतिक्विंटल २ हजार ३०० रुपयांवरून २ हजार ९०० रुयांपपर्यंत वाढले. देशातील गहू दरवाढ पाहून प्रक्रिया उद्योगाने सरकारने आपल्या साठ्यातील गहू खुल्या बाजारात विकण्याची मागणी केली. गव्हाचे दर कमी करण्यासाठी सरकारला किमान ३० लाख टन गहू खुल्या बाजारात विकावा लागेल. मात्र आधीच बफर स्टाॅक कमी असल्याने सरकारने खुल्या बाजारात गहू विक्रीचा निर्णय घेतलेला नाही. सरकारने खुल्या बाजारात हस्तक्षेप केला नाही तर गहू लवकरच दराचा विक्रमी टप्पा गाठेल, असा अंदाज प्रक्रिया उद्योगांनी व्यक्त केला आहे. 

 4. ज्वारीचे दर तेजीतच राहणार  

देशातील ज्वारी लागवड सध्या माघारली आहे. चालू आठवड्यापर्यंत देशात १७ लाख ८१ हजार हेक्टरवर ज्वारीची लागवड झाली होती. गेल्या वर्षी याच कालावधीत लागवड क्षेत्र १८ लाख ११ हजार हेक्टर होते. दुसरीकडे बाजारात सध्या ज्वारीचे दर तेजीत आहेत. सध्या ज्वारीला प्रतिक्विंटल ३ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहेत. सध्या ज्वारीची आवक कमी आहे. त्यातच लागवडही घटतेय. त्यामुळे पुढील काळात ज्वारीचे दर तेजीतच राहण्याचा जाणकारांचा अंदाज आहे.
 

5. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही बाजारांमध्ये सध्या नव्या तुरीची आवक होत आहे. मात्र नव्या मालामध्ये ओलावा जास्त आहे. महाराष्ट्रात बाजारात येत असलेल्या तुरीमध्ये १५ ते १७ टक्क्यांपर्यंत ओलावा आहे. तर कर्नाटकातही ओलाव्याचे प्रमाण जास्त आहे. सध्या बाजारातील आवक कमी असली तरी पुढील काही दिवसांमध्ये आवक वाढण्याचा अंदाज आहे. नव्या तुरीला प्रति क्विंटल ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. हा दर हमीभावापेक्षा जास्त आहे. यंदा केंद्र सरकारने तुरीसाठी प्रतिक्विंटल ६ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर केला. पण यंदा देशात तुरीचे उत्पादन कमी राहणार आहे. तुरीची लागवड कमी झाली. त्यातच पिकाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पावसाचा मोठा फटका बसला. तर आता काही भागांमध्ये तुरीवर कीड-रोग पडल्याच्या बातम्या येत आहेत. या कारणांमुळे यंदा देशातील तूर उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा किमान २० ते २५ टक्के कमी राहील, असा अंदाज काही जण व्यक्त करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही तुरीची उपलब्धता १० लाख टनांपेक्षा जास्त नसेल. त्यामुळे यंदा देशात तुरीचा पुरवठा मर्यादीत राहील. त्यामुळे तुरीला यंदा ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT