soybean market
soybean market agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : सोयाबीन भाव वाढणार; पण कधी वाढेल?

Anil Jadhao 


अनिल जाधव
पुणेः देशातील बाजारात सोयाबीनचा भाव (Soybean Rate) जवळपास एक महिन्यापासून स्थिर आहेत. देशातून सोयापेंड निर्यात (Soyacake Export) कशी होते आणि सोयातेलाचे (Soyaoil) भाव काय राहतात? यावर सोयाबीनचा बाजार अवलंबून आहे. सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळतोय. हा दर मागील एक महिन्यापासून आहे. त्यामुळं शेतकरी दरवाढीची वाट पाहत आहेत.

देशातील बाजारात आज, म्हणजेच २७ डिसेंबरला जवळपास साडेचार लाख क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर सोयाबीनच्या दरात विशेष काही बदल झाले नाहीत. मध्य प्रदेशात २ लाख २५ हजार टन सोयाबीन विक्रीसाठी आलं होतं. तर मध्य प्रदेशात आज सोयाबीनला ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळाला होता. तसंच प्रक्रिया प्लांट्सचे दर सरासरी ५ हजार ७०० रुपये होता.

महाराष्ट्रातील आवक सध्या खूपच कमी आहे. शेतकरी सध्याच्या भावात सोयाबीन विकण्यास इच्छूक नाहीत, हे यावरून स्पष्ट होते.  आजची आवक मध्य प्रदेशच्या तुलनेत निम्मीच होती. आज राज्यात दीड लाख टन सोयाबीन विक्रीसाठी आले होते. तर या सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळाला. प्रक्रिया प्लांट्सचे दर सरासरी ५ हजार ७०० रुपयांवर होते.


आंतरराष्ट्रीय बाजाराचा मिळेल आधार
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर मागील आठवड्यापर्यंत काहीसे सुधारले होते. सोयापेंडही महाग झाली होती. ख्रिसमस आणि नव वर्षाच्या सुट्ट्या संपून ४ जानेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात व्यवहार सुरु होतील. त्यामुळं सोयाबीन आणि सोयापेंडचे सौदे वाढतील. तसंच जानेवारीत चीनची मागणी वाढण्याचा अंदाज आहे.अर्जेंटीना आणि ब्राझीलमधील परिस्थिती बऱ्यापैकी स्पष्ट होईल. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर सुधारू शकतात, असा अंदाज आहे.


दर कधी वाढतील?
जानेवारीच्या मध्यापर्यंत देशातील बाजारात सोयाबीनची आवक जास्त असते. त्यामुळं दरही सर्वात कमी असतात. पण यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री कमी केल्यानं दर जास्त तुटले नाहीत. पण दबावात मात्र आले. सोयाबीन दर कमी झाल्यानं सोयापेंडचे भावही कमी होऊन सोयापेंड निर्यात वाढली. तसंच सौदेही वाढले. भारतीय सोयापेंडला जानेवारीत चांगली मागणी राहण्याचा अंदाज आहे. तसंच खाद्यतेलालाही आधार मिळू शकतो. त्यामुळं सोयाबीनच्या दरातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Season : खरिपात तूर, कपाशी, हळद क्षेत्रवाढीचा अंदाज

Sludge Issue : गाळयुक्‍त खाडीमुळे चिरनेरवासी त्रस्‍त

Dam Water Stock : धरणांच्या पाणीपातळीत घट

Uttarakhand Forest Fire : सर्वोच्च न्यायालयाच्या कानउघडीनंतर थेट १० जणांचे निलंबन; ७ वननिरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस

Agrowon Sanvad : चांगल्या कापूस उत्पादनासाठी एकात्मिक कीडनियंत्रण करावे

SCROLL FOR NEXT