Tur Sowing Agrowon
ॲग्रोमनी

Tur Sowing : राज्यात कडधान्याची पेरणी २१ टक्क्यांनी कमी; तूर ९ टक्क्यांनी पिछाडीवर

Tur Market : कडधान्य उत्पादनात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. तर राज्यात कडधान्यांमध्ये तूर हे महत्वाचे पीक आहे. राज्यात ३१ जुलैपर्यंत कडधान्याचा पेरा तब्बल २१.४६ टक्क्यांनी पिछाडीवर आहे.

Team Agrowon

Tur Rate : पुणेः कडधान्य उत्पादनात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. तर राज्यात कडधान्यांमध्ये तूर हे महत्वाचे पीक आहे. राज्यात ३१ जुलैपर्यंत कडधान्याचा पेरा तब्बल २१.४६ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. त्यात तुरीच्या लागवडीतील पिछाडी ९ टक्के आहे. सर्वाधिक घट मूग आणि उडदाच्या लागवडीत दिसते.

राज्यात कडधान्याखालील सरासरी क्षेत्र २१ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्र आहे. पण मागील हंगामात केवळ १८ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. तर चालू खरिपात आतापर्यंत म्हणजेच ३१ जुलैपर्यंत १४ लाख हेक्टरवर कडधान्याचा पेरा झाला. खरिपातील कडधान्य पेरणी आतापर्यंत २१.४६ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. 

कडधान्यामध्ये सर्वात जास्त घट मुगामध्ये दिसते. मागील तीन ते चार हंगामांमध्ये ऐन मूग काढणीच्या काळात पावसाने पिकाला दणका दिला. यामुळे शेतकरी मुगाची लागवड कमी केली आहे. गेल्या हंगामात राज्यात मुगाखाली जवळपास २ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्र होतं. त्यात यंदा जवळपास ४४ टक्क्यांनी घट होऊन लागवड दीड लाख हेक्टरवर स्थिरावली.

उडदाची लागवडही ४३ टक्क्यांनी घटली आहे. राज्यात मागील खरिपात ३ लाख ४४ हजार हेक्टरवर उडदाची लागवड झाली होती. पण आतापर्यंत केवळ एक लाख ९६ हजार हेक्टरपर्यंत लागवड पोचली. इतर कडधान्याचा पेराही ३२ टक्क्यांनी घटला. तसं राहीलं तर यंदा सर्वच कडधान्याची पेरणी कमी झालेली दिसते. यामागे मुख्य कारण म्हणजे जून महिन्यात पावसाने दिलेली दडी. जून महिन्यात राज्याच्या बहुतांशी भागांमध्ये पेरणीयोग्य पाऊस नव्हता. यामुळे कडधान्य पेरणीवर परिणाम झाल्याचे दिसते.

तूर हे राज्यातील महत्वाचे कडधान्य पीक आहे. तुरीखाली राज्यात सरासरी जवळपास १३ लाख हेक्टर क्षेत्र आहे. पण मागील हंगामात ११ लाख २१ हजार हेक्टरवर पेरा रखडला होता. पण यंदा लागवडीत तब्बल ९ टक्क्यांची घट दिसते. राज्यात तुरीखाली आतापर्यंत केवळ १० लाख २१ हजार हेक्टर क्षेत्र आलं. तसेच राज्यातील सर्वच विभागांमध्ये तुरीची लागवड घटलेली दिसते.

यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र
राज्यात लातूर विभागामध्ये तुरीची सर्वाधिक ४ लाख १४ हजार हेक्टरवर लागवड झाली. जिल्ह्यानिहाय विचार करता राज्यात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक एक लाख ७ हजार हेक्टरवर तुरीची लागवड झाली. त्यानंतर अमरावती जिल्ह्यात एक लाख ६ हजार हेक्टर क्षेत्र पिकाखाली आले. बुलडाणा जिल्ह्यात ८३ हजार, वाशीम ६२ हजार, लातूर ६३ हजार, नांदेड ६२ हजार, वर्धा ५८ हजार आणि नागपूर जिल्ह्यात ५४ हजार हेक्टरवर आतापर्यंत तुरीची लागवड झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT