Soybean Crop Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Crop: सोयाबीन उत्पादनाच्या अचूक माहितीसाठी सोपाचा आर्या.एजीसोबत करार

Soybean Crop : देशातील सोयाबीन पिकाची स्थिती आणि उत्पादनाच्या माहितीसाठी सोपा आणि आर्या.एजी यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला.

Team Agrowon

Soybean : पुणेः देशातील सोयाबीन पिकाची स्थिती आणि उत्पादनाच्या माहितीसाठी सोपा आणि आर्या.एजी यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. देशातील ५१ जिल्ह्यांमध्ये या कंपनीच्या उपग्रहाद्वारे सोपाला सोयाबीनविषयी माहिती मिळणार आहे. सोयाबीन पिकाची उपग्रहाद्वारे सद्यस्थिती कळण्यास उद्योगाला मदत होणार आहे.

देशात शेतीपिकाच्या उत्पादनाविषयी नेहमी मतभेद दिसतात. पिकाची अचूक माहिती मिळण्यात अडचणी येतात. यामुळे अनेकदा उत्पादनाचे अंदाजही चुकतात. याचा फटका शेतकऱ्यांसह उद्योगांनाही बसतो. सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपा आणि आर्या.एजी यांच्यामध्ये नकुताच सामंजस्य करार झाला. या करारानुसार सोपाला आर्या.एजी या कंपनीच्या प्रकाश आणि वामा या अॅप्लीकेशनद्वारे उपग्रह निरक्षणे मिळणार आहेत. सोपाला उपग्रहामार्फत महत्वाची आकडेवारी, नकाशे आणि बदलती माहिती मिळणार आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमधील ५१ जिल्ह्यांमध्ये ही कंपनी सोपाला माहिती पुरवणार आहे.

आर्या. एजी कंपनी सोपाला मोबाईल अॅप्लीकेशन्सद्वारे या जिल्ह्यांमधील संपूर्ण सोयाबीन पिकाविषयीची माहिती पुरवणार आहे. पिकांमध्ये होणारे बदल, पिकाची होणारी सततची वाढ आणि पिकाच्या बदलत्या परिस्थितीची माहिती सोपाला देणार आहे. कंपनीचे चट्टानाथन देवराजन यांनी सांगितले की, सोपाचा सॅटलाईट भागीदार झाल्याचा आम्हाला अभिमान आहे. या भागीदारतून देशातील सोयाबीन पिकाची सद्यस्थितीची माहिती मिळेल. सोयाबीन मुल्य साखळी मजबूत करण्यासाठी सोपाने आमच्यासोबत करार केला, असेही देवराजन यांनी सांगितले.

देशातील सोयाबीन प्रक्रियादारांची सर्वात मोठी संघटना असलेल्या सोपा आणि आर्या.एजी यांच्या करारामुळे सोयाबीनची उत्पादकता आणि शाश्वतता वाढण्यास मदत होईल. सोपाला सोयाबीन पिकाची माहिती मिळण्यास या कंपनीच्या अद्ययावत तंत्रज्ञामुळे मदत होईल.
- डी एन पाठक, कार्यकारी संचालक, सोपा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast : ऑगस्टमध्ये कमजोर, सप्टेंबरमध्ये वाढणार जोर

Vidarbha Rain Alert : पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Biochar Production: कर्ब संवर्धनासाठी पीक अवशेषांपासून बायोचार निर्मिती

Turmeric Farming: हळद, आले पिकांतील अन्नद्रव्ये व्यवस्थापन 

Armyworm in Maize: मक्यातील लष्करी अळीचा करा नायनाट; कीड व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT