Soybean Market : सोयाबीन उत्पादन १२४ लाख टनांवर पोचलं; सोपाचा सुधारित अंदाज

देशात सोयाबीनचे भाव मागील सध्या दबावात आहेत. शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा असतानाच, सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपानं सर्व्हेंच्या आधारे सोयाबीन उत्पादनाचा सुधारित अंदाज ४ लाख टनानं वाढवला.
Soybean Market
Soybean Market Agrowon
Published on
Updated on

Soybean Rate : देशात सोयाबीनचे भाव (Soybean Rate) मागील सध्या दबावात आहेत. शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा असतानाच, सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपानं सर्व्हेंच्या आधारे सोयाबीन उत्पादनाचा सुधारित अंदाज ४ लाख टनानं वाढवला.

देशात २०२२ च्या खरिप हंगामात १२४ लाख टन सोयाबीन उत्पादन झालं. तर शेतकऱ्यांकडे अद्यापही सोयाबीनचा साठा (Soybean Stock) मोठ्या प्रमाणात असल्याचंही सोपानं सांगितलं.

सोपाच्या पथकाने मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये सर्व्हे केला. या तीन राज्यांतील ३७ जिल्ह्यांमधील बाजार समित्या, शेतकरी, व्यापारी, ब्रोकर्स, सोयाबीन प्रक्रियादार, वेअरहाऊसेस आणि स्टाॅकिस्ट यांच्याकडून माहिती घेण्यात आली.

२२ मार्च ते ३ एप्रिल या दरम्यान झालेल्या सर्व्हेत ७ हजार किलोमीटर क्षेत्राचा समावेश होता. सोपाच्या पथकाने सोयाबीन मूल्यसाखळीत काम करणाऱ्या सर्वच भागीदारांशी संवाद साधून उत्पादनविषयक अंदाज सादर केला.

Soybean Market
Soybean In Diet : सोयाबीन हे केवळ तेलबिया पीक नव्हे तर ते एक पौष्टिक खाद्यान्न

सोपाने सर्व्हेंतून समोर आलेल्या माहितीवरून देशातील उत्पादनाचा अंदाज वाढवला. महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये यंदा उत्पादकता चांगली राहिली. त्यामुळं उत्पादनाचा अंदाज वाढवल्याचं सोपानं म्हटलंय.

यापुर्वी देशात १ हजार ५१ किलो प्रतिहेक्टर उत्पादकतेचा अंदाज होता. पण नुक्याच झालेल्या सर्व्हेत उत्पादकता १ हजार ८४ किलोवर पोचल्याचं सोपानं म्हटलंय. देशात खरिप हंगाम २०२२ मध्ये १२४ लाख टन सोयाबीन उत्पादन झाल्याचं सोपानं म्हटलंय.

या आधी सोपाचा अंदाज १२० लाख टनांचा होता. म्हणजेच सुधारित अंदाज सोपानं ४ लाख टनांनी वाढवला.

यंदाही मध्य प्रदेश सोयाबीन उत्पादनात आघाडीवर आहे. सोपानं मध्य प्रदेशात यंदा ५४ लाख टन उत्पादन होईल, असं म्हटलंय. यापुर्वीचा अंदाज ५३ लाख टनांचा होता. तर मध्य प्रदेशातील उत्पादकता १८ किलोने वाढवून १ हजार ६९ किलो प्रतिहेक्टरवर पोचल्याचं सोपानं सांगितलं.

उत्पादकतेत मात्र यंदा महाराष्ट्रानं बाजी मारली. महाराष्ट्रातील उत्पादकता ५४ किलोने वाढवली असून १ हजार १३४ किलोवर पोचल्याचंही सोपानं स्पष्ट केलं. महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादनाचा अंदाजही ६६ हजार टनांनी वाढवला. महाराष्ट्रात यंदा ४९ लाख २५ हजार टन उत्पादन होईल.

Soybean Market
Soybean Market : सोयाबीन बाजार का स्थिरावला?

राजस्थानमध्येही यंदा उत्पादकता चांगली राहिली. त्यामुळं उत्पादन १० लाख ३४ हजार टनांवर पोचलं. तर कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, गुजरात आणि इतर राज्यांमध्ये उत्पादन आणि उत्पादकता स्थिर असल्याचं सोपानं म्हटलंय.

देशातील सोयाबीन उत्पादनाचा अंदाज सोपानं वाढवला तरी सरकारच्या अंदाजापेक्षा कमीच आहे. सरकारनं यंदा १३९ लाख टन सोयाबीन उत्पादन झाल्याचा दुसरा अंदाज जाहिर केला आहे.

देशातील शेतकऱ्यांकडे अद्यापही मोठ्या प्रमाणात सोयाबीन असल्याचे सोपाच्या सर्व्हेतून समोर आले. मागील दोन वर्षे सोयाबीनला चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांनी सोयाबीन मागे ठेवल्याचं सोपानं म्हटलंय. शेतकऱ्यांना यंदा सोयाबीनसाठी ७ हजार रुपये दराची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे बाजारात प्रत्यक्ष ४ हजार ९०० ते ५ हजार ३५५ रुपयांचा भाव मिळतोय, असंही सोपानं सांगितलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com