Sugar Market Agrowon
ॲग्रोमनी

Sugar Market : काही कारखान्यांनी मोडले साखर विक्रीचे करार

साखरेच्या दरात वाढ झाली. त्यामुळे काही कारखाने झालेले करार पाळताना दिसत नाहीत. तर काही कारखान्यांनी पुन्हा वाटाघाटी सुरु केल्या आहेत.

Team Agrowon

पुणेः केंद्र सरकारने यंदा देशातून ६० लाख टन साखर निर्यातीचा (Sugar Export) कोटा जाहीर केला. मात्र त्याआधीच कारखान्यांनी साखर विक्रीचे (Sale of sugar) करार केले होते. मात्र आता साखरेच्या दरात (SugarRate) वाढ झाली. त्यामुळे काही कारखाने झालेले करार पाळताना दिसत नाहीत. तर काही कारखान्यांनी पुन्हा वाटाघाटी सुरु केल्या आहेत.

भारताने मागील हंगामात ११० लाख टन साखर निर्यात केली होती.  मात्र यंदा केंद्राने निर्यात कोटा जाहीर करण्याआधीच कारखान्यांनी ऑगस्ट महिन्यापासूनच साखर विक्रीचे करार सुरु केले होते. कारखान्यांनी जवळपास २० लाख टन साखर विक्रीचे करार केले. मात्र यंदा केंद्र सरकारने ६० लाख टन निर्यातीला परवानगी दिली. त्यामुळे जागतिक बाजारात साखरेच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली.

दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील साखर कारखान्यांनी ३४ हजार रुपये प्रतिटनाने साखर विक्रीचे करार केले. आंतरराष्ट्रीय बाजारात ही साखर ४२० डाॅलर प्रतिटनाने निर्यात झाली असती. मात्र आता दर ३७ हजार रुपयांवर पोचले. दरात अचानक एवढी वाढ झाल्याने काही साखर कारखान्यांनी करारात पुन्हा वाटाघाटी करण्यास सुरुवात केली किंवा करार रदद् केल्याचे वृत्त राॅयटर्स या वृत्तसंस्थेने दिले.

मुंबई येथील जागतिक व्यापारी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की आर्थिकदृष्ट्या कुमकुवत असलेल्या साखर कारखान्यांनी करार पाळले नाहीत. साखर खरेदीदार संस्था करारापेक्षा चढ्या दराने वाटाघाटी करण्यास तयार असतानाही हे कारखाने करार रद्द करण्याची दाट शक्यता आहे. 

डाॅलरच्या तुलनेत रुपयाचे मोठ्या प्रमाणात अवमुल्यन झाले. त्यातच केंद्र सरकारने ६० लाख टनांचा निर्यात कोटा जाहीर केल्यानंतर भारतीय साखरेचे दर वाढले. दरात मोठी वाढ झाल्यानंतर काही साखर कारखान्यांनी जवळपास ४ लाख टन साखर विक्रीचे करार पाळले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

व्यापारी संस्थांनी कारखान्यांशी करार केल्यानंतर पुढे खरेदीदारांना साखर विक्री केली. आता कारखान्यांनी करार मोडले, मात्र व्यापारी संस्था आपली विश्वासार्हता टिकून
ठेवण्यासाठी करार मोडू शकत नाहीत. व्यापारी संस्थांना तोटा सहन करून आपले करार पूर्ण करावे लागतील, अशी माहिती व्यापारी संस्थांनकडून देण्यात आली. 

महाराष्ट्रातील कारखान्यांनी करार मोडल्यानंतर व्यापारी संस्थांना आता उत्तर प्रदेशातून साखर खरेदी करावी लागत आहे, असं एका डिलरनं सांगितलं. भारतीय कारखान्यांनी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात डिलेव्हरीचे ४० लाख टन साखर निर्यातीचे करार केले आहेत. निर्यातदारांनी ४९० डाॅलर प्रतिटनाने व्यवहार केले. तर लंडनमधील साखरेचे वायदे ५६८ डाॅलर प्रतिटनांवर होते. त्यामुळं भारतीय साखर आजही आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त पडत आहे. 

भारत मुख्यतः इंडोनेशिया, बांगलादेश, इराक, मलेशिया, युएई आणि आफ्रिकेतील देशांमध्ये साखर निर्यात करत असतो. बहुतेक कारखान्यांनी आत्तापर्यंत मिळालेल्या कोट्यापैकी निम्म्या साखरेचे व्यवहार केले आहेत. मात्र आता साखरेचे दर वाढत आहेत. त्यामुळे अनेक कारखान्यांनी विक्रीचे करार बंद केले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Traditional Fisherman : पांरपरिक मच्छीमारांची मालवण येथील कार्यालयावर धडक

Wild Vegetables : गावागावांत रानभाजी महोत्सव व्हावा : पाटील

Crop Loan : बँकांनी सर्व कर्जाचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करावे

Onion Cultivation : कांदा लागवडीला वेग; क्षेत्र घटण्याची शक्यता

Girna River : गिरणा परिसरातील सर्वच बंधारे तुडुंब

SCROLL FOR NEXT