Rice Export Agrowon
ॲग्रोमनी

भारताच्या तांदूळ निर्यातीत मोठ्या वाढीचा अंदाज

Team Agrowon

२०२२-२०२३ या आर्थिक वर्षातही भारताच्या तांदूळ निर्यातीत (Rice Export) वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात २ कोटी टन तांदूळ निर्यातीचे करार करण्यात आले आहेत. २०२०-२०२१ या आर्थिक वर्षातील तांदूळ निर्यातीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षातील आतापर्यंतच्या तांदूळ निर्यातीतून ९.६ अब्ज डॉलर्सने अधिकची कमाई केली आहे.

देशभरात यंदा सरासरी मॉन्सूनचा अंदाज वर्तवण्यात आला आल्यामुळे तांदळाच्या उत्पादनात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. भातपिकाची लागवड प्राधान्याने खरिपात (Kharif) केली जाते. त्यामुळे देशाच्या तांदूळ निर्यातीच्या धोरणास गती मिळण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे.

फायनान्शियल एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. भारत गेल्या काही वर्षांपासून तांदळाचा प्रमुख निर्यातदार (Rice Exporter) बनला आहे. २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात भारताने तांदूळ निर्यातीच्या माध्यमातून ८.७ अब्ज डॉलर्सची कमाई केली होती.

देशाकडील तांदळाचा अतिरिक्त साठा आणि खरिपात होणाऱ्या तांदळाच्या वाढत्या उत्पादनामुळे देशाच्या तांदूळ निर्यातीचा वेग कायम राहणार आहे. भारतातील एकूण तांदूळ उत्पादनाच्या ८० टक्के उत्पादन खरिप हंगामात (Kharif season)घेतले जाते.

फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाकडे (FCI) १ एप्रिल २०२२ अखेरीस ३ कोटी २० लाख टन तांदूळ उपलब्ध आहे. तांदळाच्या साठवणुकीची कमाल मर्यादा १ कोटी ३५ लाख ८० हजार टन असताना एफसीआयकडे (FCI) तांदळाचा एवढा प्रचंड साठा उपलब्ध आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी (Public Distribution System) आवश्यक तांदळापेक्षाही अधिकतम तांदूळ आपल्याकडे शिल्लक असल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे.

२०२२ या आर्थिक वर्षात जागतिक बाजारात ५ कोटी २५ लाख टन तांदळाची उलाढाल होणार असल्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) वर्तवला आहे. यातील २ कोटी १० लाख टन तांदूळ भारताचा असेल तर तर ६० लाख टन तांदूळ व्हिएतनामचा असण्याची शक्यताही यूएसडीएने वर्तवली आहे.

डायरेक्टोरेट जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजन्स अँड स्टॅटिस्टिक्सने (DGCIS) दिलेल्या माहितीनुसार २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात भारताने १५० देशांना तांदळाचा पुरवठा केला आहे. विशेष म्हणजे यावर्षी भारताकडून तांदूळ खरेदी करणाऱ्या देशांत वैविध्य दिसून आले असल्याचे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने नमूद केले आहे.

सौदी अरेबिया, इराण आणि मध्य पूर्व आशियायी देशांना भारत बासमती तांदळाचा (Basmati Rice) पुरवठा करतो. तर नेपाळ, बांगलादेश, चीन, कोट डील्व्होरी, टोगो, सेनेगल, व्हिएतनाम,मादागास्कर, सोमालिया, मलेशिया, डिजिबोटी, सौदी अरेबिया, सौरी अरब अमिराती, गुइनीआ, पश्चिम आफ्रिकन देश बेनिन इत्यादी देशांत भारताकडून बिगर बासमती तांदूळ (Non-Basmati Rice) पुरवला जातो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT