कसा गाठला भारताने ५० अब्ज डॉलर्स कृषिमाल निर्यातीचा टप्पा ?

२०२१-२०२२ या आर्थिक वर्षात भारताने १० अब्ज डॉलर्सचा तांदूळ (rice) विविध देशांना निर्यात केला आहे. हे प्रमाण जगभरातील तांदळाच्या एकूण निर्यातीच्या निम्मे भरते आहे. भारताने या वर्षी ८ अब्ज डॉलर्सची सागरी उत्पादने (marine products) निर्यात केली आहेत.
Agricultural Export
Agricultural ExportAgrowon

भारताने २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात ५० अब्ज डॉलर्स कृषी निर्यातीचे (Agricultural Export) उद्दिष्ट गाठले असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने वृत्तसंस्थेला दिली आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचीही माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

२०१३-२०१४ या आर्थिक वर्षात भारताच्या कृषी निर्यातीचे (Agricultural Export) प्रमाण ४३ अब्ज डॉलर्स एवढे होते. त्यानंतरच्या काळात देशाच्या कृषी निर्यातीचे प्रमाण घसरले होते. २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात कृषी मालाची निर्यात १० अब्ज डॉलर्सवर येऊन ठेपली. या घसरणीमागे चार कारणे असल्याचे वाणिज्य मंत्रालयाच्या लक्षात आल्याचे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Agricultural Export
केंद्राकडून ६९.२४ लाख टन गव्हाची खरेदी

कृषी मालाच्या आयात आणि निर्यातीत ताळमेळ नव्हता. तसेच राज्य सरकार आणि शेतकऱ्यांनाही निर्यातक्षम उत्पादनाची संकल्पना लक्षात आली नव्हती. निर्यातीची व्याप्ती केवळ केंद्र सरकारापुरतीच सीमित होती, निर्यातीसाठी पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे वाणिज्य मंत्रालयांच्या निदर्शनास आले. त्यानंतरच्या काळात वाणिज्य मंत्रालयाकडून या त्रुटी दूर करण्यावर भर देण्यात आला.

कृषी निर्यात (Agricultural Export) वाढवण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एक कृती आराखडा तयार केला. त्याच्या अंमलबजावणीला केवळ राज्यस्तरीयच नव्हे तर जिल्हा आणि गावपातळीवरील शेतकऱ्यांनीही प्रतिसाद दिल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी म्हटले आहे.

Agricultural Export
गव्हाची जागतिक मागणी पूर्ण करण्यास भारत समर्थ

शेतकऱ्यांकडे अतिरिक्त उत्पादन असेल तर त्याच्या निर्यातीला प्राधान्य दिले पाहिजे, त्यासाठी केंद्र सरकार सर्व प्रकारची मदत करायला तयार असल्याचा संदेश शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाने विशेष जनजागृती अभियान राबवले.

या अभियाना अंतर्गत शेतमाल निर्यात क्षेत्रातील अभ्यासकांनी, विशेषज्ञांनी गावपातळीवर जाऊन शेतकऱ्यांना निर्यातक्षम उत्पादनाचे मार्गदर्शन केले. उत्पादनाची गुणवत्ता सुधारणे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने साठवणूक अशा सर्वच विषयावर शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात आल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.

विक्रेते, खरेदीदारांचे ऑनलाईन परिसंवाद, प्रशासकीय समन्वय, वाहतुक व्यवस्था, कापणीनंतरच्या पायाभूत सुविधांची उभारणी अशा सर्वच आघाड्यांवर हे अभियान राबवण्यात आले. केंद्रीय मंत्रालयाने राज्यांतीलपायाभूत सुविधा उभारणी क्षेत्रातील संभाव्य शक्यता ओळखून त्यांच्या उभारणीसाठी मदत करण्याचा निर्णय घेतला.गव्हाची निर्यात

गव्हाची निर्यातआजमितीस ज्या बाजारात भारतीय कृषी मालाची निर्यात होते आहे तिथला पुरवठा अधिक गतिमान करणे, भारतीय कृषी मालाला नव्या बाजारपेठा उपलब्ध कशा होतील, याचा शोध घेण्यात आला. यादरम्यान जगभरातील देशांच्या खाद्यान्न गरज ओळखून तशी यादी तयार करण्यात आली. या सर्व उपायांचा परिणाम म्हणून २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात भारताला विक्रमी अशी ५० अब्ज डॉलर्सची निर्यात करणे शक्य झाल्याचे वाणिज्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Agricultural Export
पंजाबमधील गव्हाची २० टक्के प्रत खालावली

२०२१-२०२२ या आर्थिक वर्षात भारताने १० अब्ज डॉलर्सचा तांदूळ (Rice) विविध देशांना निर्यात केला आहे. हे प्रमाण जगभरातील तांदळाच्या एकूण निर्यातीच्या निम्मे भरते आहे. भारताने या वर्षी ८ अब्ज डॉलर्सची सागरी उत्पादने (Marine Products) निर्यात केली आहेत. ४.५ अब्ज डॉलर्सची साखर (Sugar) निर्यात केली आहे. २ अब्ज डॉलर्सचा गहू (Wheat), १ अब्ज डॉलर्सची कॉफी, ४ अब्ज डॉलर्सचे दुग्धजन्य पदार्थ, मांस, पोल्ट्री उत्पादने निर्यात केली आहेत तर ३ अब्ज डॉलर्सचा कापूस निर्यात केला असल्याचेही केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने नमूद केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com