Raju Shetti
Raju Shetti Agrowon
ॲग्रोमनी

शिल्लक ऊस आघाडी सरकारचे अपयश ः राजू शेट्टी

टीम ॲग्रोवन

फलटण शहर, जि. सातारा : राज्यात ऊस पिकाखाली किती क्षेत्र आहे हे माहिती असूनही त्याच्या गाळपाबाबतचे नियोजन करण्यात सरकार कुठेतरी कमी पडले. त्यामुळेच शिल्लक उसाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. शिल्लक उसाचा प्रश्‍न हे महाविकास आघाडी सरकारचे सर्वांत मोठे अपयश आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केली.

श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘कारखान्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस शिल्लक असताना ते बंद होत असतील तर ही गंभीर बाब आहे. कारण हा ऊस अचानकपणे उगविलेला नाही. त्याची १४ ते १६ महिन्यांपूर्वी लागण झालेली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे राज्यात किती क्षेत्र ऊस पिकाच्या लागवडीखाली आहे, हे त्या वेळीच स्पष्ट झाले आहे. राज्यात १९० कारखाने चालू आहेत. या कारखान्यांची गाळप क्षमता किती आहे, हेही सरकारला माहिती होते. या सर्वांचा हिशेब केला असता किती ऊस अतिरिक्त होऊ शकतो, हे सरकारच्या वर्षभरापूर्वीच ध्यानात यायला हवे होते.

राज्यातील ४० ते ५० कारखाने असे आहेत, की त्यातील काही चालू बंद चालू या अवस्थेतील कारखान्यांचे संचालक व खासगी असतील, तर त्यांचे मालक यांच्या मानगुटीला धरून सरकारने सांगायला हवे होते, की हे तुम्ही स्वतः चालवा, अन्यथा सक्षम यंत्रणेकडे चालवायला द्या. आम्हाला येथील कार्यक्षेत्रातील ऊसगाळप करायचा आहे. जे कारखाने कायमस्वरूपी बंद आहेत, ते पाच- दहा वर्षांच्या करारावर सक्षम लोकांना चालवायला देऊन उसाची विल्हेवाट लावायला हवी होती; परंतु हे करायला सरकार कमी पडल्याने शिल्लक उसाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला.’’ या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामूलकर, फलटण तालुकाप्रमुख नितीन यादव आदी उपस्थित होते.

..तर स्वाभिमानी कायदा हातात घेईल

महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. त्यांना सुरळीत वीजपुरवठा होत नाही. डीपी बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. याबाबत महावितरणने योग्य पावले उचलावीत, अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कायदा हातात घ्यायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी महावितरणला या वेळी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT