Bio Energy
Bio Energy Agrowon
ॲग्रोमनी

कृषी क्षेत्राला ऊर्जा क्षेत्राकडे परावर्तित करण्याची गरज : गडकरी

Team Agrowon

साखरेच्या अतिरिक्त उत्पादनाचा भार देशाच्या अर्थव्यवस्थेला सहन करावा लागतो. त्यामुळेच कृषी क्षेत्राला (Agriculture) ऊर्जा निर्मिती क्षेत्राकडे परावर्तित करण्याची गरज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केली.

मुंबई येथे आयोजित राष्ट्रीय सह निर्मिती २०२२ पुरस्कार वितरण सोहळ्यात गडकरी बोलत होते. भविष्यातील तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यायी इंधन (Alternative fuels) निर्मितीवर भर देण्याची गरज गडकरी यांनी व्यक्त केली.

आपल्या देशातील ६५ ते ७० टक्के जनता कृषी क्षेत्रावर अवलंबून असून कृषी क्षेत्राचा विकास दर (Agricultural Growth Rate) केवळ १२ ते १३ टक्के आहे. शेतकरी आणि ऊस उत्पादन क्षेत्र आपल्या उद्योग क्षेत्राचे आधार आहेत. यातील पुढचा टप्पा म्हणून साखरेपासून सहनिर्मिती करून उत्पन्नाचे साधन मिळवायला हवे.

साखर उद्योग क्षेत्राने (Sugar Industry) साखरेचे उत्पादन कमी करून सह निर्मितीवर भर द्यायला हवा. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊर्जा क्षेत्राची गरज भागवायला हवी. या माध्यमातूनही कृषी क्षेत्राला चांगले उत्पन्न मिळू शकेल. असे झाल्यास शेतकरी केवळ धान्य उत्पादकच नव्हे ऊर्जा उत्पादकही (Energy Producers) बनतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

यावर्षी आपली साखरेची गरज २८० लाख टन असताना प्रत्यक्षातील साखर उत्पादन (Sugar Production) ३६० लाख टनांपेक्षा जास्त झाले. ब्राझीलमधील परिस्थितीमुळे भारताची ही अतिरिक्त साखर विकल्या जाईल.

इथेनॉलची मागणी जास्त असल्यामुळे आपण साखरेऐवजी इथेनॉल उत्पादनाला (Ethanol Production) प्राधान्य द्यायला हवे. गेल्या वर्षी इथेनॉल निर्मितीची क्षमता ४०० कोटी लिटर होती; इथेनॉल उत्पादन वाढीसाठी आपण भरपूर प्रयत्न केले. आता तंत्रज्ञानाचा वापर करून बायोइथेनॉलपासून ऊर्जा निर्मिती करायला हवी, त्यासाठी इथेनॉलच्या मागणीचे नियोजन करण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले.

पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉलचे कॅलोरीफीक मूल्य (Calorific Value) कमी असल्याचे संशोधकांशी केलेल्या चर्चेदरम्यान स्पष्ट झाले आहे. मात्र रशियन तंत्रज्ञानाच्या आधारे आपण इथेनॉलचे कॅलोरीफीक मूल्य पेट्रोलएवढे करू शकतो.

ऊस तोडणीसाठी (Harvesting Technologies) तंत्रज्ञानाच्या वापराचा आग्रह धरताना गडकरी यांनी, ऊस तोडणी यंत्रात इंधन म्हणून इथेनॉलचा वापर करता येईल आणि ऊस तोडणीसाठी इंधनावर होणाऱ्या खर्चात बचत होईल, असेही गडकरी यांनी नमूद केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT