Onion Market
Onion Market Agrowon
ॲग्रोमनी

Onion Subsidy : कांद्याला मिळणार ३५० रुपये अनुदान; अनुदानासाठी अर्ज कसा करावा?

Anil Jadhao 

Onion Rate : राज्यातील कांदा उत्पादक चालू हंगामात चांगलेच अडचणीत आले. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं राज्य सरकारनं अनुदान जाहिर केले. पण या अनुदानावर शेतकरी समाधानी नाहीत.

या अनुदानातून उत्पादन खर्चही वसूल होणार नाही, असे शेतकरी सांगत आहेत. तर सरकारनं परराज्यात कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना वगळले.

आपल्याला माहितीच आहे की लाल कांद्याची आवक वाढल्यानंतर बाजारात दर पडले होते. कांद्याचा उत्पादन खर्च १ हजार ५०० रुपयांपर्यंत असताना बाजारात २०० ते ६०० रुपये दर मिळत होता. त्यामुळं शेतकरी संतप्त झाले.

अधिवेशनाच्या काळात कांदा दराचा प्रश्न गाजला. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी ३०० रुपये अनुदान जाहीर केले होते. तेव्हापासून सरकार अनुदान वितरणाची प्रक्रिया कसे राबवते? याची उत्सुकता होती.

राज्य सरकारने कांदा अनुदानाबाबतची अधिसूचना आज जाहीर केली. या अधिसूचनेतून शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण सरकारनं अनुदानाची रक्कम ३०० ऐवजी ३५० रुपये देऊ केली. एका शेतकऱ्याला जास्ती जास्त २०० क्विंटलसाठी अनुदान मिळेल.

राज्यातील मुंबई बाजार समिती वगळता इतर बाजार समित्या, तसेच खाजगी बाजार समित्या तसेच नाफेडला कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.

व्यापाऱ्यांचा तसेच परराज्यातून आवक झालेल्या कांद्यालाही अनुदानातून वगळले. परराज्यात कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही.

पण इतर राज्यांना लागून असलेल्या गावातील शेतकरी त्या राज्यातील जवळच्या बाजारात किंवा जास्त दर मिळत असलेल्या बाजारात कांदा विकत असतात. पण सरकारच्या अनुदानातून या शेतकऱ्यांना वगळण्यात आले.

यामुळं परराज्यात कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांसोबत दुजाभाव होत असल्याचं धाराशिव जिल्ह्यातील केमवाडी येथील शेतकरी युवराज नकाते यांनी सांगितलं.

अनुदानासाठी असा करा अर्ज

ज्या शेतकऱ्यांनी १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या दोन महिन्यातील काळात कांदा विकला त्यांनाच अनुदान मिळणार आहे. तसचं फक्त लाल कांद्यासाठीचे हे अनुदान असेल. अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांनी कांदा विक्री पावती, सात बारा उतार आणि बॅंक खात्याच्या माहितीसह ज्या बाजार समितीत कांदा विक्री केला त्या बाजार समितीत अर्ज करावा. शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त करुन देण्याचे प्रस्ताव संबंधित बाजार समिती तयार करणार आहे.

तोटा भरून निघणार नाही

सरकारच्या या अनुदानावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना क्विंटलमागं एक हजार रुपयांपर्यंत तोटा झाला. सरकरानं फक्त ३५० रुपयांची मदत जाहीर केली. म्हणजेच शेतकऱ्यांना ६०० रुपयांचा तही तोटा सहन करावा लागेल, असं शेतकऱ्यांनी सांगितलं.

दरवर्षी कर्नाटकात कांदा विकतो. हैदराबादलाही आमच्या भागातून कांदा जातो. यंदा राज्यात कांद्याचे भाव कोसळले होते. त्यामुळे यंदाही बंगळुरू बाजारात ६० टन कांदा विकला. तेथेही दर कमीच मिळाला. पण सरकारनं आम्हाला अनुदानातून वगळलं. हा आमच्यावर अन्याय आहे. सरकारनं परराज्यात कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांनाही अनुदान द्यावे.
युवराज नकाते, कांदा उत्पादक, केमवाडी, जि. धाराशिव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनचा बाजार दबावात; कापूस, सोयाबीन, गहू, आले यांचे दर काय आहेत?

Pre Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व वादळी पावसाचा दणका

APMC Market : व्यापाऱ्यांचा माल ओट्यांवर, तर शेतकऱ्यांचा रस्त्यावर

Koyna Dam : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणात इतका पाणीसाठी शिल्लक, सांगलीकरांना पाणी मिळणार?

Maharashtra Rain : राज्यभरात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज; राज्यात उन्हाचा चटकाही कायम; पावसाचा जोर वाढणार

SCROLL FOR NEXT