Sugar Mill Agrowon
ॲग्रोमनी

Sugar Mill : नॅचरल उद्योग समूह पंधरा टक्के लाभांश

बी.बी.ठोंबरे : सभासदांना लाभांश देणारा देशांतील पहिला साखर उद्योग

टीम ॲग्रोवन

शिराढोण ः नॅचरल उद्योग समूहाला (Natural Business Group) गतवर्षात १३ कोटी ३७ लाख रुपये नफा झाला असून कारखाना सभासदांना १५ टक्के लाभांश देणार असल्याची माहिती उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषीरत्न बी बी ठोंबरे (B.B. Thombre) यांनी दिली. सभासदांना लाभांश देणारा देशांतील पहिला साखर उद्योग (Sugar Mill) आहे.

उसाचे अपेक्षीत गाळप होवूनही साखर कारखाना युनिट तोट्यात जाऊनही केवळ उपपदार्थ निर्मितीमुळे नॅचरल शुगर नफ्यात असल्याचे कृषिरत्न बी.बी.ठोंबरे यांनी सांगितले. नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि.साईनगर रांजणी,कारखान्याची २३ वी वार्षिक सर्व साधारण सभा नॅचरल उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष कृषीरत्न

बी.बी.ठोंबरे यांचे अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता.२९) रोजी सकाळी अकरा वाजता घेण्यात आली त्यावेळी श्री ठोंबरे बोलत होते.यावेळी ज्येष्ठ संचालक ज्ञानेश्वरराव काळदाते, अनिल ठोंबरे, हर्षल ठोंबरे, बिभीषण भातलंवडे, सुनील कोचेटा, धनंजय दारफळकर, राजपाल माने उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री ठोंबरे म्हणाले, की साखर उद्योग यशस्वी करून दाखवण्याचे काम नॅचरल शुगरने केले आहे आणि ते म्हणजे साखर कारखान्याचे ऊस गाळपा बरोबरच उपपदार्थ निर्मितीमधून वीज निर्मिती, इथेनॉल व बायो सीएनजी प्रकल्प, डेअरी प्रकल्पामुळे कारखाना नफ्यात आहे. साखर उद्योग टिकवून ठेवावयाचा असेल

तर साखर उत्पादनात बरोबरच उपपदार्थ निर्मिती करून त्या मधून नफा मिळवावा लागेल, असे श्री ठोंबरे यांनी सांगितले.

चालू गळीत हंगामा मध्ये प्रति दिन ७५०० मेट्रीक टन गाळप क्षमता वाढणार असून आसवनी प्रकल्पाची क्षमता वाढवण्यात येणार आहे.या वर्षीच्या गळीत हंगामात कारखान्याचे कार्यक्षेत्रातील सभासदासह बिगर सभासदांच्या सर्व उसाचे गाळप करणार असल्याचे

श्री ठोंबरे यांनी सांगितले. साखर कारखाना, डिस्टिलरी आणि दूध डेअरी यांचे माध्यमातून जास्तीत जास्त उत्पादन घेऊन शेतक-यांचे हीत जोपासण्याचा कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले. यावेळी नफा-तोटा पत्रकाचे वाचन लेखा परीक्षक सुनील कोचेटा यांनी केले.

उपपदार्थातून ७० कोटी नफा..

उपपदार्थांचे माध्यमातून नॅचरल शुगर अहवाल वर्षात साखर, स्टील व युनिट नं.-२ कडील तोटा भरून काढून तेरा कोटी ३७ लाख रुपये नफ्यात असल्याचे सांगितले. या वर्षात नॅचरल शुगरने सर्वाधीक ऊस दर दिल्याचे श्री ठोंबरे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT