Indian Agriculture Agrowon
ॲग्रोमनी

Summer Sowing : उन्हाळी हंगामात मुगाला मिळतेय पसंती

Rabi Sowing : यंदा रब्बी पेरणीसाठी पोषक हवामान होते. पण उन्हाळी पिकांची लागवड बदलत्या वातावरणामुळे काहीशी प्रभावित होत आहे.

Team Agrowon

Summer Crop Sowing : यंदा रब्बी पेरणीसाठी पोषक हवामान होते. पण उन्हाळी पिकांची लागवड बदलत्या वातावरणामुळे काहीशी प्रभावित होत आहे. यंदा गेल्यावर्षीपेक्षा उन्हाळी लागवड काहीशी घटली. तर उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी कडधान्य आणि भरडधान्याला प्राधान्य दिल्याचे दिसते.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहीतीनुसार, देशात आतापर्यंत उन्हाळी पिकांची लागवड ६५ लाख २९ हजार हेक्टरवर झाली. गेल्यावर्षी याच काळातील लागवड ६६ लाख हेक्टरवर होती. म्हणजेच यंदा गेल्यावर्षीपेक्षा पिकांची लागवड काहीशी घटली आहे.

यंदाच्या हंगामात कडधान्य आणि भरडधान्य पिकांना पसंती मिळताना दिसत आहे. तर यंदा भात आणि तेलबिया पिकांची लागवड कमी झाली.

उन्हाळी हंगामात कडधान्य पिकांची लागवड वाढली. आतापर्यंत देशात १७ लाख ५७ हजार हेक्टरवर उन्हाळी पिकांची लागवड झाली. तर गेल्याहंगामात याच काळातील लागवड १६ लाख २३ हजार हेक्टरवर होती. कडधान्यामध्ये मुगाला सर्वाधिक पसंती मिळत आहे.

मुगाची सर्वाधिक १४ लाख २७ हजार हेक्टरवर लागवड झाली. मागील हंगामात १२ लाख ८३ हजार हेक्टरवर लागवड दिसत होती. तर उडदाची लागवड मात्र काहीशी घटली आहे. यंदा उडदाखाली ३ लाख ८ हजार हेक्टर क्षेत्र आहे. मागील हंगामात याच काळातील लागवड ३ लाख १२ हजार हेक्टर होती.

भरडधान्यात मक्याला पसंती

भरडधान्यामध्ये उन्हाळी लागवडीत मक्याला पसंती मिळाली. भरडधान्याखाली सध्या १० लाख ८६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. गेल्या हंगामात याच काळातील लागवड १० लाख १९ हजार हेक्टरवर होती. मक्याची ६ लाक ३० हजार हेक्टरवर लागवड झाली.

गेल्या हंगामातील लागवड ६ लाख २४ हजार हेक्टरवर होती. बाजऱ्याची लागवडही ३ लाख ५९ हजार हेक्टरवरून यंदा ४ लाख २९ हजार हेक्टरवर पोचली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT