Kharif MSP Agrowon
ॲग्रोमनी

Kharif MSP : कापसाच्या हमीभावात ६४० रूपये, तर सोयाबीनमध्ये ३०० रुपये वाढ

MSP Update : महाराष्ट्रात खरीपातील मुख्य पीक बनलेल्या सोयाबीनचा हमीभाव ३०० रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल ४ हजार ६०० रुपये करण्यात आला. तर तुरीच्या हमीभावात ४०० रूपयांची वाढ करून तो ७००० रूपये करण्यात आला.

Team Agrowon

MSP Update : केंद्र सरकारने २०२३-२४ च्या खरीप हंगामासाठी कापसाच्या किमान आधारभूत किंमतीत (हमीभाव) ६४० रुपयांची वाढ केली. तिळाच्या हमीभावात सर्वाधिक ८०५ रुपयांची तर मुगाच्या हमीभावात ८०३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 

महाराष्ट्रात खरीपातील मुख्य पीक बनलेल्या सोयाबीनचा हमीभाव ३०० रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल ४ हजार ६०० रुपये करण्यात आला. तर तुरीच्या हमीभावात ४०० रूपयांची वाढ करून तो ७००० रूपये करण्यात आला.

केंद्र सरकारने बुधवारी (ता. ७)  खरीप २०२३-२४ या हंगामासाठी किमान आधारभूत किंमती जाहीर केल्या. केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाने आधारभूत किंमतींच्या शिफारशी सरकारला सादर केल्या.

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत आधारभूत किंमतींवर शिक्कामोर्तब करण्यात आले.  

पिकांच्या उत्पादन खर्चावर किमान ५० टक्के नफा देऊन हमीभाव निश्चित करण्यात आले, असा दावा केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी केला. बाजरीला उत्पादनखर्चापेक्षा सर्वाधिक ८२ टक्के अधिक हमीभाव देण्यात आला; तर तुरीसाठी उत्पादन खर्चावर ५८ टक्के नफ्यासह हमीभाव जाहीर केला, असेही गोयल यांनी सांगितले.

गेल्या दोन महिन्यांपासून कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले आहेत. हंगामातील निचांकी भावपातळीवर दोन्ही शेतीमालांचे व्यवहार होत आहेत. खरिपातील हमीभाव जाहीर झाल्यानंतर बाजाराला आधार मिळू शकतो, असा अंदाज काही जाणकार व्यक्त करत होते.

या पार्श्वभूमीवर सरकारने यंदा कापसाच्या हमीभावात बऱ्यापैकी वाढ केली आहे.  मध्यम लांबीच्या धाग्यासाठी ५४० रुपयांची वाढ केली. तर लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव ६४० रुपयांनी वाढवला. मध्यम धाग्याच्या कापसाला प्रति क्विंटल ६ हजार ६२० रुपये तर लांब धाग्याच्या कापसाला ७ हजार २० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला.

उडदाच्या हमीभावात ३५० रुपयांची वाढ करून तो ६ हजार ९५० रुपये करण्यात आला. भुईमुगाचा हमीभाव ५२७ रुपयांनी वाढवून ६ हजार ३७७ रुपये करण्यात आला. 

मक्यात सर्वात कमी वाढ

केंद्राने चालू हंगामात मक्याच्या हमीभावात सर्वात कमी वाढ केली. गेल्या हंगामात मक्याला १ हजार ९६२ रुपये हमीभाव होता. त्यात आता १२८ रुपयांची वाढ करण्यात आली.  यंदाच्या हंगामात २ हजार ९० रुपये हमीभाव असेल.

भातामध्ये १४३ रुपयांची वाढ झाली. यंदा सामान्य ग्रेडच्या भाताला २ हजार १८३ रुपये आणि ए ग्रेडच्या भाताला २ हजार २०३ रुपये हमीभाव जाहीर झाला आहे.

पीकनिहाय हमीभावातील वाढ

पीक…२०२२-२३…२०२३-२४…वाढ

कापूस मध्यम धागा…६०८०…६६२०…५४०

कापूस लांब धागा…६३८०…७०२०…६४०

सोयाबीन…४३००…४६००…३०००

तूर…६६००…७०००…४००

मका…१९६२…२०९०…१२८

मूग…७७५५…८५५८…८०३

उडीद…६६००…६९५०…३५०

भुईमूग…५८५०…६३७७…५२७

सूर्यफुल…६४००…६७६०…३६०

तीळ…७८३०…८६३५…८०५

कारळे…७२८७…७७३४…४४७

बाजरा…२३५०…२५००…१५०

रागी…३५७८…३८४६…२६८

ज्वारी हायब्रीड…२९७०…३१८०…२१०

ज्वारी मालदांडी…२९९०…३२२५…२३५

भात सामान्य ग्रेड…२०४०…२१८३…१४३

भात ए ग्रेड…२०६०…२२०३…१४३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT