Rice Export Agrowon
ॲग्रोमनी

Rice Demand : कर्नाटक सरकार निवडणुकीतील मोफत तांदूळाचे आश्वासन पाळण्यासाठी तेलंगणाकडून खरेदी करणार

Rice production : देशात तेलंगणा भात उत्पादनात महत्वाचे राज्य आहे. सध्या तेलंगणाला भातासाठी विशेष महत्व आले आहे. कारण शेजारील कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू ही राज्ये तेलंगणाकडून तांदूळ खेरदी करणार आहेत.

Team Agrowon

Rice Update : देशात तेलंगणा भात उत्पादनात महत्वाचे राज्य आहे. सध्या तेलंगणाला भातासाठी विशेष महत्व आले आहे. कारण शेजारील कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू ही राज्ये तेलंगणाकडून तांदूळ खेरदी करणार आहेत.

कर्नाटकातील काॅग्रेस सरकारला निवडणुकीच्या काळात दिलेले मोफत तांदळाचे आश्वासन पाळण्यासाठी महिन्याला दोन लाख टनांची गरज आहे. त्यासाठी तेलंगणातून तांदूळ खरेदीचा विचार कर्नाटक सरकार करत आहे.

कर्नाटकात काॅग्रेसने निवडणुकीच्या काळात मोफत तांदूळ देण्याची घोषणा केली होती. यासाठी अन्न भाग्य योजना राबविली जाणार आहे. या योजनेसाठी कर्नाटक सरकारला महिन्याला दोन लाख टनांपेक्षा जास्त तांदूळ लागणार आहे.

त्यामुळे कर्नाटकने तेलंगणा सरकारकडे मागणी केली, अशी माहिती तेलंगणाचे कृषिमंत्री सिंगीरेड्डी निरंजन रेड्डी यांनी दिली. सरकार यावर विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तमिळनाडू सरकारनेही तेलंगणाकडे तीन लाख टन तांदळाची मागणी केली आहे. अर्ध उकडलेल्या तांदळाची खरेदी करण्याचीही तयारी तमिळनाडू सरकारने दर्शविली आहे.

तेलंगणात यंदा भात उत्पादनात मोठी वाढ झाली. राज्यातील भात उत्पादनात चार पटीने वाढ झाली आहे. यंदाच्या हंगामात २६० लाख टन भात उत्पादन झाले आहे. यातून १६० लाख टन तांदूळ मिळणार आहे.

राज्यातील भात लागवडही चार पटीने वाढून १२१ लाख एकरवर पोचली, असे तेलंगणा सरकारने म्हटले आहे. नुकत्याच संपलेल्या रबी हंगामात तेलंगणा सरकारने ६६ लाख टन भाताची खरेदी केली.

तांदळाला मागणी असली तरी तेलंगणापुढे अर्ध उकडलेल्या तांदळाचा प्रश्न कायम आहे. हा तांदूळ खरेदीसाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करत आहे.

नुकतेच तेलंगणाचे उद्योगमंत्री के टी रामाराव केंद्रीय ग्राहक, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन अर्ध उकडलेल्या तांदळाची किमान २० लाख टन खरेदी करावी, अशी मागणी केली. तेलंगणा रबी हंगामात २३ लाख हेक्टरवर भात लागवड होते. हे क्षेत्र देशातील एकूण क्षेत्राच्या ५० टक्के आहे, असेही राव यांनी सांगितले.

केंद्र सरकारने केवळ भाताची खरेदी केल्यास तेलंगणा सरकारवर आर्थिक बोजा पडेल. त्यामुळे केंद्राने किमान १० लाख टन अर्धउकडलेला तांदूळ खरेदी करावा. त्यानंतर आमच्याकडे ३४ लाख टन तांदूळ असेल, असे राव यांनी गोयल यांना सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT