Wheat Export Agrowon
ॲग्रोमनी

गहू निर्यातवाढीसाठी भारताने कसली कंबर

रशिया युक्रेन संघर्षामुळे निर्माण झालेल्या खाद्यसंकटाच्या पार्श्वभूमीवर भारत जगाची भूक भागवण्यास तयार असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी जगातल्या अनेक खरेदीदार देशांना साद घातली आहे.

Team Agrowon

रशिया-युक्रेन युद्धामुळे जगातील अनेक देशांनी भारताकडे कृषी उत्पादनांची मागणी केली आहे. विशेषतः भारतीय गव्हाला विचारणा वाढली आहे. या परिस्थितीत भारताकडून कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने कृषी उत्पादनांच्या निर्यातवाढीसाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली आहे. खाद्य निर्यातीसाठी लागणारी कागदोपत्री पूर्वतयारी केली जात आहे. भारताकडे करण्यात आलेल्या मागणीनुसार संबंधित खरेदीदारांच्या गरजांची पूर्तता करण्यात येत आहे.

रशिया युक्रेन संघर्षामुळे निर्माण झालेल्या खाद्यसंकटाच्या पार्श्वभूमीवर भारत जगाची भूक भागवण्यास तयार असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी जगातल्या अनेक खरेदीदार देशांना साद घातली आहे. मोदींच्या वक्तव्याचा संदर्भ देत उद्योग व वाणिज्य मंत्री गोयल यांनी गहू निर्यातीसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

रशिया-युक्रेन संघर्षामुळे निर्माण झालेल्या खाद्यसंकटामुळे भारताला कृषी निर्यातीची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. आपल्या निर्यातवाढीबरोबरच आपल्या क्षमता तपासण्याची हीच वेळ असल्याचे गोयल म्हणाले आहेत.

केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाने यासाठी एक अंतर्गत समिती स्थापन केली आहे. ही समिती जगातील १८० देशाच्या खाद्य गरजांचा अभ्यास करत आहे. यातल्या प्रत्येक देशांनी आजवर मागवलेल्या उत्पादनांचा विचार करून त्या उत्पादनांची पूर्तत्याच्या शक्यता समितीकडून तपासण्यात येत आहेत. त्यासाठीचे निर्णय घेतले जात आहेत. तसेच भारताकडे नोंदवण्यात आलेल्या २ हजार मागण्यांच्या पूर्ततेसाठीचीही पूर्वतयारी युद्धपातळीवर सुरु आहे.

विशेषतः गहू नियातीचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे. आपल्याकडे सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी आवश्यक गव्हापेक्षा अधिक साठे उपलब्ध असल्याचे गोयल म्हणाले आहेत.

रशिया आणि युक्रेनच्या पुरवठ्यावर अवलंबून असलेल्या मध्य-पूर्व आणि उत्तर आफ्रिकन देशांकडून आता गव्हाची विचारणा केली जात आहे. २०२१-२०२२ मध्ये जेवढा गहू निर्यात झाला त्याच्या निम्म्या गहू निर्यातीचे करार गेल्या ४० दिवसांत झाल्याचे गोयल म्हणाले आहेत.

इजिप्तचे एक शिष्टमंडळ भारतात गव्हासाठी दाखल होत आहे. मार्च महिन्यात आपण इजिप्तच्या वाणिज्य मंत्र्यांशी यासंदर्भात संवाद साधला होता. त्यानुसार आता भारत इजिप्तची गव्हाची मागणी पुरवणार आहे. इजिप्तशिवाय अनेक आखाती देशांनीही भारताकडे गव्हाची मागणी नोंदवली असल्याचेही गोयल म्हणाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Cultivation : कांदा लागवडीला वेग; क्षेत्र घटण्याची शक्यता

Girna River : गिरणा परिसरातील सर्वच बंधारे तुडुंब

Wildlife Crop Damage : पिकांचे जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी शासन सकारात्मक

MahaDBT : ‘महाडीबीटी’ पोर्टलवर कागदपत्रे अपलोडसह अनेक अडचणी

Book Review: ध्यासपंथी वाटचालींचा कोलाज

SCROLL FOR NEXT