Sugar Production Agrowon
ॲग्रोमनी

साखर उत्पादनात भारत बनला जगात नंबर वन

ब्राझीलला मागे टाकत पटकावले अग्रस्थान

Raj Chougule

कोल्हापूर : साखर उत्पादनात (Sugar Production) बोलबाला असणाऱ्या ब्राझीलला (Brazil sugar) मागे टाकत भारत नंबर वन बनला आहे. साखर उत्पादनाचे रेकॉर्ड (Record Sugar Export) तोडत भारताने अग्रस्थान पटकावले आहे.निर्यातीमध्ये ही भारताने दुसऱ्या स्थानावर उडी घेतली आहे.

ब्राझीलमध्ये (हंगाम २०२१)तेथील हवामानामुळे झालेले उसाचे कमी उत्पादन आणि तेथील कारखान्यांनी साखरेपेक्षा इथेनॉल निर्मितीला दिलेले प्राधान्य यामुळे भारताने ब्राझीलवर यंदा साखर उत्पादनात मात केली आहे. ब्राझीलमध्ये संपलेल्या हंगामात २७५ लाख टन उत्पादन झाले. त्या तुलनेत भारताने साखर उत्पादनात मुसंडी मारताना ३५५ लाख टन साखर तयार केली आहे. यात अजूनही वाढ होणार आहे.

ब्राझीलमध्ये गेल्यावर्षी हंगाम सुरू होताना अवर्षणाचे संकट होते. काही काळानंतर पाऊस झाला असला तरी उसाची वाढ हव्या त्या प्रमाणात झाली नाही. यामुळे साखरेच्या उत्पादनात घट आली. हंगामाच्या मध्यानंतर उसाची प्रत खालावल्याने कारखान्यांनी साखर निर्मिती पेक्षा इथेनॉल निर्मितीला अधिक ऊस वापरला. रशिया युक्रेन युद्धामुळे क्रूड तेलाचे भाव वाढल्याने ब्राझीलने सहाजिकच जो ऊस उपलब्ध आहे. त्याचे इथेनॉल करण्याला प्राधान्य दिले. अगोदरच उसाचे उत्पादन कमी आणि त्यात इथेनॉलला प्राधान्य दिल्याने साखरेच्या उत्पादनात मोठी घट आली. इथेनॉल निर्मितीकडे वळल्याने ब्राझीलने गेल्या महिन्यात केलेले काही निर्यात करारही थांबवले.

भारतामध्ये मात्र चांगल्या पावसामुळे यंदा उसाचे उत्पादन बहुतांशी राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत दीडपट झाले. भारतीय कारखान्यांनी इथेनॉललाही प्राधान्य दिले असले तरी ब्राझीलच्या तुलनेत ते कमी होते. यामुळे भारतातील साखर उत्पादन वाढतच राहिले. अजूनही भारतातला हंगाम सुरू आहे.

भारतातही यंदा साखर उत्पादनाबाबतचे अंदाज चुकले. दरवर्षी आघाडीवर असणाऱ्या उत्तर प्रदेशला मागे टाकत महाराष्ट्रातने यंदा साखर उत्पादनात निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले तसेच कर्नाटक मध्येही चांगले उत्पादन झाले. याचाच परिपाक म्हणून तीनशे पन्नास लाख टनांहून अधिक उत्पन्न भारतात झाले. याचा परिणाम निर्यातवाढीवर ही झाला. २०१७ -१८ ला असणारी केवळ ६ लाख टनांची निर्यात २०२१-२२ मध्ये ९० टनांपर्यंत गेली आहे. निर्यातीने आणि कारखानदारांना स्थानिक पातळीवर दर नसतानाही आधार दिला.

देशात यंदा साखरेच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. यामुळे भारत हा ब्राझीलपेक्षा जादा साखर उत्पादन घेणारा देश बनला आहे.
सुबोध सिंह, सचिव, केंद्रीय खाद्य विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Alert: मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाची शक्यता

Rain Crop Damage: पावसामुळे १४९० हेक्टरला फटका

Milk Regulation: उत्पादक, विक्रेत्यांना नोंदणी बंधनकारक

Unseasonal Rain Impact: पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच

Pesticide Price Increase : कीटकनाशकांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता; पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा विस्कळीत

SCROLL FOR NEXT