Chana
Chana  Agrowon
ॲग्रोमनी

Chana Cultivation : देशात यंदा कोणत्या राज्यांमध्ये हरभरा लागवड वाढली? कुठे लागवड घटली?

Anil Jadhao 

Chana bajarbhav : जगात हरभरा लागवड (Gram Cultivation) आणि उत्पादनात भारत आघाडीवर आहे. जगातील एकूण एकूण उत्पादनापैकी तब्बल ७० टक्के उत्पादन भारतात होते.

यंदा देशातील हरभरा लागवड घटली. मात्र महाराष्ट्रातील लागवड १० टक्क्यांनी वाढली. महाराष्ट्रात यंदा सर्वाधिक २९ लाख हेक्टरवर लागवड झाली.

जगात हरभरा उत्पादन वर्षागणिक वाढतच आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, टर्की, रशिया, म्यानमार, पाकिस्तान, अमेरिका, मेक्सिको, इराण आदी ६० ते ६५ देशांमध्ये हरभऱ्याचे उत्पादन होते. मात्र भारताचा वाटा अधिक आहे. जगात हरभरा उत्पादनात सतत वाढच होत गेली.

२०१६ मध्ये जागतिक हरभरा उत्पादन ११६.२ लाख टनांवर होते. ते २०१८ साली १६९.४ लाख टनांवर पोचले. त्यात पुन्हा घट होऊन २०२० साली १५०.८ लाख टनांवर आले.

२०२१ मध्ये हरभरा उत्पादन पुन्हा १७० लाख टनांवर पोचले, असे जाणकारांनी सांगितले. मात्र जागतिक पातळीवर हरभरा लागवड आणि उत्पादन दिवसेंदिवस वाढत आहे.

भारतात जगात सर्वाधिक हरभरा लागवड होते. भारतात रब्बी हंगामात हरभरा पीक घेतले जाते. देशातील एकूण रब्बी पिकांचा विचार केला तर सर्वाधिक क्षेत्र हरभऱ्याखाली असते. २०१८-१९ मध्ये देशात हरभऱ्याची सर्वांत कमी लागवड झाली.

त्यावर्षी ९६.१९ लाख हेक्टरवर हरभरा पीक होते. तर २०१६-१७ साली ९९ लाख हेक्टरवर पेरणी होती. त्यानंतर हरभरा लागवड वाढतच गेली. देशातील वाढता हरभरा वापर आणि सरकारने वाढविलेला हमीभाव यामुळे लागवडीत वाढ झाल्याचे जाणकार सांगतात.

चालू हंगामात जवळपास ११२ लाख हेक्टरवर हरभरा लागवड झाली. यंदा गेल्या हंगामाच्या तुलनेत जवळपास २ टक्क्यांनी हरभरा लागवड घटली. यंदा माॅन्सून चांगला झाला. त्यामुळे रब्बी पिकासाठी पाणी उपलब्ध होते. पण मागील वर्षभर हरभऱ्याला चांगला भाव मिळाला नाही. त्यामुळं देशातील लागवड घटल्याचे सांगितले जाते.

मध्य प्रदेशातील क्षेत्र घटलं

देशात दरवर्षी मध्य प्रदेशात हरभरा लागवड सर्वाधिक होत असते. मध्य प्रदेशात हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र ३० लाख हेक्टर आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.

महाराष्ट्रात मागील पाच वर्षांत सरासरी १९ लाख हेक्टरवर तर राजस्थानमध्ये १७ लाख हेक्टरवर हरभऱ्याची लागवड झाली. परंतु मागील दोन वर्षांपासून लागवडीचे चित्र बदलले. महाराष्ट्राने सलग दुसऱ्यावर्षी हरभरा लागवडीत बाजी मारली.

महाराष्ट्रात यंदा सर्वाधिक लागवड

एकट्या महाराष्ट्रात लागवड १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढली. राज्यात २९ लाख हेक्टरवर हरभरा उभा आहे. यंदा महाराष्ट्रातच सर्वाधिक क्षेत्र वाढले. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पेरा यंदा कमी राहिला. मध्य प्रदेशातील पेरा २५ लाख हेक्टरवरवरून यंदा २२ लाख हेक्टरवर आला.

तर गुजरातमधील लागवड ११ लाख हेक्टरवरून ७ लाख ६५ हजार हेक्टरवर पोचली. राजस्थानमध्येही हरभरा लागवड जवळपास दीड लाख हेक्टरने घटली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT