Jeera Prices Agrowon
ॲग्रोमनी

Jeera Market Prices : जिऱ्याचे भाव का तडतडले? दहा दिवसांत भाव प्रति क्विंटल ३९ हजार रूपयांवर

Jeera Market Rate : भारतातील घराघरांत स्वयंपाकाला चवीची फोडणी देणारा घटक म्हणजे जिरा. महाराष्‍ट्रात जिऱ्याचे फारसे उत्पादन होत नसले तरी खप मात्र मोठा आहे.

Team Agrowon

Unseasonal Rain : भारतातील घराघरांत स्वयंपाकाला चवीची फोडणी देणारा घटक म्हणजे जिरा (Cumin Seeds). महाराष्‍ट्रात जिऱ्याचे फारसे उत्पादन होत नसले तरी खप मात्र मोठा आहे. सध्या या जिऱ्याच्या किंमती चांगल्या तडतडल्यात.

देशातील प्रमुख बाजारांत जिऱ्याच्या दरात मोठी तेजी आलीय. गेल्या दहा दिवसांत जिऱ्याचे भाव ३६ हजार रूपये क्विंटलवरून ३९ हजार ७६५ रूपयांवर पोहोचलेत.

जिरा उत्पादनात आघाडीची राज्ये आहेत राजस्थान आणि गुजरात. तिथे अवकाळी पावसाचा जबर फटका बसल्यामुळे जिरा पिकाचं मोठं नुकसान झालंय.

राजस्थानात ७० टक्के तर गुजरातमध्ये ३० टक्के पिकाची काढणी अजून बाकी आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तसेच या जिऱ्याची गुणवत्ताही मार खाईल.

यंदा जिऱ्याचा शिल्लक साठा कमी असल्यामुळे पुरवठ्यात मोठी तूट आहे. त्यात उत्पादन घटणार असल्यानं पुरवठा आणखीनच आक्रसून जाईल. दुसऱ्या बाजूला निर्यातीला वाढती मागणी आहे. त्यामुळे जिऱ्याच्या दराने उसळी घेतली आहे.

फेडरेशन ऑफ इंडियन स्पाईस स्टेकहोल्डर्स (एफआयएसएस)च्या अंदाजानुसार यंदा जिऱ्याची मागणी ८५ लाख पोत्यांपेक्षा अधिक राहील; तर पुरवठा मात्र ६५ लाख पोत्यांच्या आसपास असेल. एका पोते ५५ किलोचे असते.

यंदा जिरा पिकाला काढणीच्या काळात दोन वेळा पावसाचा मोठा फटका बसला. आधीच्या अंदाजाप्रमाणे यंदा ७० लाख पोत्यांची आवक अपेक्षित होती.

परंतु ती ६० लाख पोत्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. शिल्लक साठा ५ लाख पोत्यांचा आहे. त्यामुळे यंदा एकूण पुरवठा ६५ लाख पोत्यांच्या घरात राहील, असे मानले जात आहे.

यंदा जिऱ्याच्या मागणी-पुरवठ्यात मोठी तफावत राहणार आहे. त्यामुळे जिऱ्याच्या दरातील तेजी टिकून राहण्याचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Skill Development: कौशल्यांनी परिपूर्ण युवकांनाच देश-विदेशात संधी

Agricultural Issues: बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात

Farmer Protest: कर्जमाफीसाठी सरकारला भाग पाडणार

Kharif Sowing: पुणे विभागात खरिपाचा ८९ टक्के पेरा

Farmer ID: फार्मर आयडीच्या गोंधळाचा शेतकऱ्यांना फटका

SCROLL FOR NEXT