Ginger Rate Agrowon
ॲग्रोमनी

Ginger Rate : आल्याच्या दरात सुधारणा

कोरोना आगमनापासून आले पिकांत झालेल्या घसरणीमुळे आले उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले होते; मात्र, मागील १५ दिवसांपासून पिकांच्या दरात अल्प सुधारणा झाली आहे.

विकास जाधव 

सातारा : कोरोना आगमनापासून आले पिकांत झालेल्या घसरणीमुळे आले उत्पादक (Ginger Producer) शेतकरी मेटाकुटीला आले होते; मात्र, मागील १५ दिवसांपासून पिकांच्या दरात (Improvement In Ginger Rate) अल्प सुधारणा झाली आहे. आले पिकाच्या (Ginger Crop) प्रतिगाडीमागे (५०० किलो) दरात सहा ते सात हजार रुपयांनी सुधारणा झाली असून, सध्या प्रतिगाडीस १४ ते १६ हजार रुपये दर मिळू लागला आहे.

आले पीक गेल्या चार ते पाच वर्षांपासून संकटाच्या गर्तेत सापडले होते. कोरोनाचा संसर्ग राहिल्याने दरात कायम घसरण, वाढलेल्या किडी व रोगामुळे वाढलेला भांडवली खर्च यामुळे आले उत्पादक शेतकरी तोट्यात गेले आहेत. परिणामी आल्याच्या क्षेत्रातही घट झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रतिगाडीस चार ते सहा हजार रुपयांवर दर गेले नव्हते. हा न परवडणारा दर व उत्पादनात झालेल्या घटीमुळे काही शेतकऱ्यांनी आले न काढता, तसेच जमिनीत ठेवले होते. सध्या मात्र जून महिन्यापासून दरात अल्प वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

प्रतिगाडीमागे सहा ते सात हजार रुपये दरात सुधारणा होऊन सध्या प्रतिगाडीस १४ ते १६ हजार रुपये दर मिळू लागला आहे. सलग चार वर्ष अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना हा मिळत असलेला दर काही प्रमाणात दिलासादायक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. खते, औषधे यांच्या दरात वाढ झाल्याने आल्याच्या भांडवलात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दर कमी असल्याने आले पिकांची आर्थिक गणिते जुळत नव्हती. दरात सुधारणा झाल्याने किमान भांडवली खर्च निघू शकतो. मात्र, दर स्थिरता राहणे आवश्‍यक असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

नवीन लागवडीचा कल कमी

तीन वर्षांत आले उत्पादक कमालीचा अडचणीत आल्याने नवीन आले लागवडीचा कल कमी झाला आहे. मिळणारा दर व उत्पादन याचा मेळ बसत नसल्याने किमान ३० ते ४० टक्के आले पिकांच्या क्षेत्रात घट होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. या घटीमुळे आल्याचे उत्पादन कमी होणार आहे.

मागील तीन वर्षांत आले पिकांचे दर वाढलेले नाहीत; मात्र, गेल्या महिन्यापासून आल्याची मागणी वाढू लागल्याने दरात वाढ होऊ लागली आहे. सध्या आल्याच्या प्रतिगाडीस सरासरी १४ हजारांपासून १६ हजारांपर्यंत दर दिला जात आहे.
अमित यादव, आले व्यापारी, सासपडे, ता. सातारा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Crisis: करे कोई, भरे कोई...!

Farm Pond: शेततळे कोरडेच

Bt Cotton Launch: कपाशी सरळ वाणांच्या बीटी बियाण्यांचे लोकार्पण

Chaskaman Dam: चासकमान धरणातून रब्बीसाठी आवर्तन सुरू

Manikrao Kokate: मंत्री कोकाटे यांची दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा कायम

SCROLL FOR NEXT