Cotton
Cotton Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Rate : कापूस दरात सुधारणा

Team Agrowon

पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कापूस दरात (Cotton Rate) आज वाढ पाहायला मिळाली. कापसाचे दर आज जवळपास साडेपाच टक्क्याने वाढले होते. तर तर कापूस दराने ८१ सेंटवरून ८७ सेंट प्रतिपाऊंडवर झेप घेतली. आंतरराष्ट्रीय बाजारात दर सुधारल्याने देशातील बाजारातही कापसाचे दर क्विंटलमागे १०० ते २०० रुपयाने वाढले होते.

देशातील कापूस हंगाम एक ऑक्टोबरला सुरु झाला. पण तेव्हापासून कापूस बाजार दबावात यायला सुरुवात झाली होती. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवाड्यापासून बाजारात कापूस आवक वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दर हळूहळू दबावात आले. सुरुवातीला ८ ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलवर असलेले कापसाचे दर दोन दिवसांपुर्वी ६ हजार ५०० ते ८ हजार ४०० रुपयांवर पोचले होते. मागील १५ दिवस कापूस बाजार याच दराच्या दरम्यान स्थिर होता.

पण आज आंतरराष्ट्रीय तसेच देशातील बाजारात कापसाचे दर सुधारले. इंटरकाॅंटीनेन्टल एक्सचेंजवर अर्थात आयसीईवर कापसाच्या वायद्यांमध्ये आज सुधारणा पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारातही ऑगस्ट महिन्यापासून कापसाच्या दरात सतत घट होत गेली. भारतातील कापूस हंगाम सुरु झाल्यानंतरचा विचार केल्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाने सर्वांत कमी ७१.२७ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा ३१ ऑक्टोबर रोजी गाठला होता.

त्यानंतर मात्र कापसाच्या दरात काहीशी सुधारणा होत गेली. आज कापसाने १२ ऑक्टोबरनंतरचा सर्वाधिक ८७.४० सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला. आज कापसाच्या दरात जवळपास साडेपाच टक्क्यांनी सुधारणा झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला उठाव मिळाल्याने बाजारात चैतन्य आले होते. परिणामी दरातील वाढ आज दिवसभर कायम होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर सुधारल्याने देशातील बाजारालाही आधार मिळाला. आज देशातील कापूस दर क्विंटलमागे १०० ते २०० रुपयाने सुधारलेले दिसले. देशात कापसाला आज ७ हजार ते ८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. तर राज्यातील सरासरी दर ७ हजार १०० ते ८ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान राहिला. कापसाचे दर जास्त दिवस दबावात राहणार नाहीत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी वाढल्यास देशातही कापसाचे दर सुधारतील. फेब्रुवारीपर्यंत कापूस सरासरी ९ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहचू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री बाजाराचा आढावा घेऊन टप्प्यटप्प्याने केल्यास फायदेशीर ठरेल, असे जाणकारांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT