Edible Oil: खाद्यतेल आयातीशिवाय भारताला पर्याय नाही

भारत मेहता; यंदा गेल्यावर्षीपेक्षा कमी आय़ात होणार
Edible Oil
Edible OilAgrowon
Published on
Updated on

पुणेः देशात मागील वर्षात १४० लाख टन खाद्यतेलाची आयात झाली. मात्र यंदा आयात १३५ लाख टनांच्या दरम्यान राहील. तर २०२५-२६ मध्ये देशाची खाद्यतेलाची (Edible Oil) गरज २७० लाख टनांपर्यंत पोहचू शकते. मात्र देशातील खाद्यतेल उत्पादन १४० लाख टनांपर्यंत वाढेल. म्हणजेच देशाला निम्मी गरज आयातीतून पूर्ण करावी लागेल, असा अंदाज साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (SEAI) कार्यकारी संचालक भारत मेहता (Bharat Mehata) यांनी व्यक्त केला. ते इंडोनेशिया पाम ऑईल काॅन्फरन्समध्ये बोलत होते.

Edible Oil
Madhavrao More : मुलूख मैदानी तोफ

भारत मेहता म्हणाले की, देशात २०२१-२२ या तेल विपणन वर्षात म्हणजेच नोव्हेंबर २०२१ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत जवळपास १४० लाख टन खाद्यतेलाची आयात झाली. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये देशात २६ लाख टन खाद्यतेलाचा साठा होता. त्यामुळे चालू वर्षातील आयात गेल्यावर्षीपेक्षा कमी राहील. यंदा १३० ते १३५ लाख टन खाद्यतेल आयात होईल. खाद्यतेलाचे दर कसे राहतात, यावरून कोणतं तेल जास्त आयात होईल, हे ठरेल, असेही मेहता यांनी सांगितलं.

भारतात १ ऑक्टोबर २०२१ ला २० लाख टन खाद्यतेलाचा शिल्लक साठा होता. तर तो यंदा २५ लाख टनांवर पोचला. म्हणजेच १ ऑक्टोबर २०२२ ला गेल्यावर्षीपेक्षा जास्त साठा होता. देशाचा विचार करता महिन्याला १९ लाख टन खाद्यतेलाची गरज असते. सध्याच्या साठ्याचा विचार केल्यास देशाची ४० दिवसांची गरज भागेल. हा शिल्लक साठा आत्तापर्यंतचा सर्वाधिक आहे. गेल्यावर्षी १४० लाख टन आयात झाल्याने शिल्लक साठा जास्त असल्याचं मेहता यांनी सांगितले.

भारत सरकारने नुकतेच तेलबिया आणि खाद्यतेलावरील स्टाॅक लिमिट काढले. त्याचे सर्व व्यापारी आयातदारांनी स्वागत केले. देशात २०१८-१९ मध्ये सर्वाधिक १४९ लाख टन खाद्यतेल आयात झाली होती. तर २०१९-२० मधील आयात १३० लाख टनांपर्यंत कमी झाली. या वर्षात कोरोनामुळे देशातील खाद्यतेलाची मागणी कमी झाली आणि देशातील उत्पादनही वाढले होते. कोरनाकाळात देशातील खाद्यतेलाचा वापर दीड टक्क्यांपर्यंत कमी झाला होता, असंही मेहता म्हणाले. 

मेहता पुढे म्हणाले की, आता परिस्थिती पुर्वपदावर येत आहे. पुढील पाच वर्षात देशातील खाद्यतेल वापर वाढीचा वेग सरासरी २ ते ३ टक्क्यांच्या दरम्यान राहील. ही वाढ लक्षात घेतल्यास २०२५-२६ मध्ये देशाला वार्षीक २५५ ते २७० लाख टन खाद्यतेलाची गरज भासेल. मात्र देशातील तेलबिया उत्पादन ३८० ते ४०० लाख टनांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. तर देशातील खाद्यतेलाचं उत्पादन या काळात ३० लाख टनांनी वाढून १३५ ते १४० लाख टनांपर्यंत पोचेल. म्हणजेच देशात केवळ मागणीच्या तुलनेत निम्मेच खाद्यतेल उत्पादन होईल. उर्वरित खाद्यतेल देशाला आयात करावे लागेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com