Cotton Market
Cotton Market Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market Today: देशातील कापूस दरात सुधारणा; दरवाढीचा कल कायम राहण्याची शक्यता

Anil Jadhao 

Cotto Rate In India : देशातील कापूस उत्पादकांना (Cotton Producer) दिलासा देणाऱ्या घडामोडी सध्या बाजारात घडत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातही कापसाचे दर (Cotton Rate) सुधारले आहेत. कापूस वायदे तसेच हजर बाजारात कापसाच्या दर आज वाढले आहेत.

कापसाचे सरासरी भाव ७ हजार ८०० ते ८ हजार ३०० रुपयांदरम्यान पोचले. पुढील काळात कापसाची आवक कमी झाल्यानंतर दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायदे आणि प्रत्यक्ष खरेदीच्या दरात चांगली सुधारणा झाली. कापूस वायद्यांमध्ये जवळपास ५ सेंटची सुधारणा होऊन, दरानं ८२.४७ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला होता. कापसाचा भाव जवळपास १५ हजार रुपये प्रति क्विंटलवर पोचला.

देशातील कापूस वायद्यांमध्येही २२० रुपयांची सुधारणा होऊन दर ६१ हजार ४४० रुपये प्रतिखंडीवर पोचला. एका खंडीत ३५६ किलो रुई असते. क्विंटलमध्ये सांगायचं झालं तर १७ हजार २५३ रुपये भाव आहेत. देशातील वायद्यांमधील दर जवळपास २ हजार रुपयांनी अधिक आहेत.

आता प्रत्यक्ष खरेदी म्हणजेच हजर बाजारात काय स्थिती राहीली ते पाहू, वायद्यांसोबत हजर बाजारातही सुधारणा झाली. आंतरराष्ट्रीय हजार बाजारात कापसाचे दर ३ टक्क्यांपर्यंत वाढले. जगभरातील महत्वाच्या देशांमध्ये रुईचे सरासरी दर ९३ सेंट प्रतिपाऊंड होते.

रुपयात हा भाव जवळपास १७ हजार रुपये होतो. तर भारतातील हजर बाजारात कापूस खंडीचे भाव सरासरी ६० हजार रुपये आहेत. क्विंटलमध्ये हा भाव १६ हजार ८५० रुपये होतो. म्हणजेच सध्या भारतातील हजर बाजारातील दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपेक्षा कमी आहेत.

कापूस दर वाढले

मार्च महिन्यात कापसाची आवक सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट झाली. त्यामुळं दरावर दबाव आला होता. पण मागील दोन ते तीन दिवसांपासून कापसाची आवक कमी झाली, असे अकोट जिनिंग प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष संदीप बूब यांनी सांगितले.

आज अकोट बाजारात कापसाचा कमाल भाव ८ हजार ४०० रुपये मिळाला. तशा पावत्या सोशल मिडियावर फिरत होत्या. परंतु हा भाव मोजक्या कापसाला मिळाला. कापसाचे भाव वाढल्याचं यावरून स्पष्ट होतं. पण सर्वच कापसाला हा भाव मिळाला नाही, हेही धान्यात घ्यावं.

दरात आणखी सुधारणा शक्य

देशातील कापूस आवक मागील दोन दिवसांमध्ये काहीशी कमी झाली. त्याचा आधार कापसाला मिळत आहे. पण आवक सरासरीपेक्षा जास्तच आहे. त्यामुळं दरातील वाढही मर्यादीत आहे. एप्रिलमध्ये काही दिवस आवकेचा दबाव राहू शकतो.

पण कापसाचे दर सध्याच्या पातळीवरून घटण्याची शक्यता नाही. कापसाची आवक कमी झाल्यानंतर दरात आणखी ५०० रुपयांपर्यंत सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

याकडेही लक्ष असावं

बाजारातील फंडामेंटल्स बदलले की दरावर परिणाम होत असतो. पण देशातील उत्पादन आणि वापर पाहता कापूस बाजार पुढील काळात जास्त दिवस दबावात राहणार नाही.

त्यामुळं शेतकऱ्यांनी कोणत्याही ऐकीव माहितीवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष बाजारातील परिस्थिती पाहूनच कापसाची विक्री करावी, असं आवाहनही जाणकारांनी केलंय.

देशातील कापूस उत्पादन यंदा घटले. कापसाची आवक सध्या जास्त असल्यानं सरकीचे दर कमी झाले आहेत. पुढील काळात कापसाची आवक कमी राहून सरकी आणि कापसाचे दरही सुधारतील.
गोविंद वैराळे, जेष्ठ कापूस तज्ज्ञ
मागील दोन दिवसांपासून कापसाची आवक कमी झाली. त्यामुळे दरात २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली. कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ३०० रुपये दर मिळाला. तर सरकीचे दर ३ हजार ४०० रुपये आहेत. शेकऱ्यांना यंदा चांगल्या दराची अपेक्षा आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस शिल्लक ठेवला आहे.
संदीप बूब, अध्यक्ष, अकोट जिनिंग प्रेसिंग असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea Brand : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT