Jowar  Agrowon
ॲग्रोमनी

Jowar : दुर्लक्षित ज्वारीला येतंय महत्व

जगातीक पातळीवर ज्वारीची पेरणी, उत्पादन आणि वापर मागील काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात घटला. मात्र आता बदलते वातावरण आणि पोष्टीक धान्याला वाढत्या मागणीमुळे ज्वारीला पुन्हा महत्व मिळू लागले आहे.

Anil Jadhao 


अनिल जाधव
पुणेः जगातीक पातळीवर ज्वारीची पेरणी, उत्पादन आणि वापर मागील काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात घटला. मात्र आता बदलते वातावरण आणि पोष्टीक धान्याला वाढत्या मागणीमुळे ज्वारीला पुन्हा महत्व मिळू लागले आहे.

मागील दोन दशकांपासून जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र दुसरीकडे हवामान बदलामुळे शेती बिनभरवशाची होत आहे. त्यामुळे वाढलेल्या लोकसंख्येला अन्न पुरविण्याचे आव्हान निर्माण झाले. जागतिक धान्य उत्पादनाची धुरा सांभाळणाऱ्या अमेरिका, ब्राझील, अर्जेंटीना, भारत, टर्की, रशिया, युक्रेन आणि ऑस्ट्रेलियासह इतरही देशांना कमी पाऊस, दुष्काळ, पूर आणि वाढत्या उष्णतेचा सामना करावा लागत आहे.

बदलत्या वातावरणामुळे या संकटांची तीव्रता पुढील काळात वाढत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमी पावसात आणि पौष्टीक असलेल्या ज्वारीला महत्व येत आहे. जगात मानवी आहार, पशुखाद्यासोबत उद्योगातही ज्वारीचा वापर वाढला आहे. आफ्रिका आणि आशियातील देशांमध्ये मानवी आहारातील वापर जास्त आहे. तर चीन, अमेरिका आणि ब्राझील या देशांमध्ये ज्वारीचा वापर पशुखाद्यात जास्त होतो. तसेच अमेरिका, ब्राझील, अर्जेंटीना आणि इतर विकसित देशांमध्ये जैव इंधनासाठी ज्वारी वापरली जाते.

जागतिक भरडधान्य वर्ष जागतिक पातळीवर आता कमी पावसात येणाऱ्या आणि पौष्टीक पिकांना महत्व दिले जात आहे. कोरोनाकाळात लोकांना ज्वारी, बाजरीसह इतर भरडधान्याचे महत्व कळाले. त्यामुळे या पिकांना मागणी वाढले. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने २०२२-२३ हे वर्ष भरडधान्य वर्ष जाहीर केले आहे. भरडधान्यामध्ये ज्वारीला जास्त महत्व वाढणार आहे.

मक्याला पर्याय शक्य सध्या जागतिक पातळीवर शेतीपिकामध्ये मक्याचे सर्वाधिक उत्पादन होते. मात्र मक्याला जास्त अन्नद्रव्य लागते. त्यामुळे जमिनिच्या सुपिकतेवर परिणाम होतो, असे मानले जाते. त्यामुळे मक्याला पर्याय म्हणून काही देशांमध्ये ज्वारीकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे. तसे इथेनाॅलसाठी ज्वारीची काही वाणही विकसित करण्यात आलेले आहेत. मानवी आहारातही पौष्टीक धान्य म्हणून ज्वारीचा वापर वाढत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Farmer Registration: हरभरा नोंदणीला १५ एप्रिलपर्यंत मुदत

Maharashtra Heatwave Alert: कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता

Ujani Water Tourism: उजनी जलपर्यटनाचे भवितव्य अंधारात

Agriculture Officer Retirement: नाशिक ‘झेडपी’चे कृषी विकास अधिकारी शेवाळे सेवानिवृत्त

Revenue Department: अधिकाऱ्यांनी गावांत जाऊन समस्या सोडवाव्या: मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

SCROLL FOR NEXT