Harbhara Market Agrowon
ॲग्रोमनी

Harbhara Market : हरभरा बाजाराभाव यंदा कसे राहतील?

सरकारने यंदाही देशातील हरभरा उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला. मात्र बदलत्या वातावरणाचा हरभरा पिकाला फटका बसत आहे.

Anil Jadhao 

Pune News : केंद्र सरकारने (Central Government) यंदा देशात हरभरा उत्पादन चांगले राहण्याचा अंदाज व्यक्त केला. मात्र उद्योगाच्या मते देशातील हरभरा उत्पादन (Chana Production) यंदा गेल्यावर्षीपेक्षा कमीच राहील.

पिकाला बदलत्या हवामानाचाही (Change Weather) फटका बसत आहे. त्यामुळं यंदा नाफेडच्या खेरदीवरच बाजाराची भीस्त असेल, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

सरकारने यंदाही देशातील हरभरा (Gram) उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला. मात्र बदलत्या वातावरणाचा हरभरा पिकाला फटका बसत आहे. तसचं पुढील काळात ऊन वाढल्यास पिकावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं यंदा हरभरा उत्पादन सरासरीपेक्षा कमीच राहू शकतं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यंदा महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील हरभरा पिकाला कमी अधिक प्रमाणात फटका बसला. तर राजस्थानमधील पीक काहीसे चांगले असल्याचे सांगितले जाते. पण राजस्थानमध्येही काही भागांमध्ये थंडीचा हरभरा पिकावर परिणाम होत आहे.

उत्तर प्रदेशात यंदा शेतकऱ्यांनी हरभऱ्याऐवजी मसूर, गहू आणि मोहरी पिकाची लागवड केल्याचं सांगितलं जातं. तर गुजरातमध्येही पेरणी घटल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं हरभरा उत्पादन यंदा जास्तीत जास्त १०५ लाख टनांवर राहू शकतं, असा अंदाज उद्योग व्यक्त करत आहेत.

तर मागील हंगामात हरभरा उपलब्धता १३५ लाख टन राहिली. तर हरभरा वापर १०५ लाख टनांवर झाला. यंदाही हरभऱ्याचा शिल्लक साठा ३० लाख टनांच्या दरम्यान राहू शकतो, असाही अंदाज व्य्कत केला जात आहे.

नाफेडची कमी दरात विक्री

हरभरा बाजाराचा विचार करता, सलग मागील तीन वर्षे दर दबावातच राहिले. यंदा हरभरा आवक सुरु होण्याआधीच नाफेडने कमी भावात हरभऱ्याची विक्री मोठ्या प्रमाणात केली.

त्यामुळे हरभरा बाजारभाव दबावात आहेत. त्यामुळं आवकेचा दबाव वाढल्यास हरभरा दर हमीभावापेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे.

दर काय राहू शकतात?

नाफेडने हमीभावाने खरेदी सुरु केल्यास हरभरा बाजाराला काहीसा आधार मिळू शकतो. यंदा हरभऱ्याला सरासरी ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळू शकतो, असा अंदाही व्यक्त केला जात आहे.

मात्र सध्याचं तापमान बघता हरभरा उत्पादन किती हाती येते, हे पाहवे लागेल. उत्पादनात घट दिसल्यास भावाला आणखी आधार मिळू शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT