Cotton
Cotton Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : कापूस बाजार या आठवड्यात कसा राहिला? 

Anil Jadhao 

Cotton Rate Market : आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात (Cotton Rate) चढ उतार सुरु आहेत. मात्र सरासरी दरपातळी मागील तीन आठवड्यांपासून कायम आहे. देशातील बाजारात मात्र कापसाच्या दरात घट झालेली पाहायला मिळत आहे.

आजही काही बाजारांमध्ये कापसाच्या भावात नरमाई दिसली. मात्र कापूस दर (Cotton Market Rate) सुधारण्यास पोषक स्थिती असल्याने दरवाढ होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील (Cotton Market) अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील उद्योग सतत आपला कापूस भाव (Cotton Bhav) जास्त असल्याची ओरड करतात. मात्र वास्तवात देशातील कापूस भाव आता नरमले आहेत. त्यामुळे देशातून कापूस निर्यातही वाढली. दोन आठवड्यांपासून कापसाचे भाव खालच्या पातळीवर आहेत.

कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. तर रुईचे भावही प्रतिक्विंटल १७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. या दरात रुईला चांगला उठाव मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील रुईचा भाव

आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र रुईचे भाव तेजीत आहेत. सोमवारी म्हणजेच ३१ डिसेंबरला रुईचे प्रत्यक्ष खरेदीतील दर अर्थात काॅटलूक ए इंडेक्स १०२ सेंट प्रतिपाऊंडवर होता. रुपयात सांगायचं झालं तर १८ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दर होता.

आठवडाभर दरात चढ उतार पाहायला मिळाले. तर शुक्रावारी काॅटलूक ए इंडेक्स काहीसा कमी होऊन १००.९५ सेंट प्रतिबुशेल्सपर्यंत नरमला होता. रुपयात हा दर १८ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल होतो. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रत्यक्ष कापूस खरेदीचे दर या आठवड्यात क्विंटलमागं काहीस नरमले पण भारताच्या दरापेक्षा जास्तच होते.

कापसाचे वायदे कसे राहिले?

आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांचा विचार करता, सोमवारी मार्च डिलेव्हरीचे वायदे ८६ सेंट प्रतिपाऊंडवर होते. रुपयात रुईचा हा दर १५ हजार ४६८ रुपये प्रतिक्विंटल होतो.

तर शुक्रवारी वायदे ८५.३२ सेंटवर बंद झाला. रुपयात हा भाव १५ हजार ४४७ रुपये होतो. म्हणजेच वायद्यांमध्ये कापसाच्या दरात फारशी घट या आठवड्यात झाली नाही. दरपातळी टिकून होती.

काय राहू शकते स्थिती

देशात चालू आठवड्यात कापूस दर कमी होते. बाजारातील आवकही काहीशी जास्त होती. उद्योगही या दरात शेतकरी कापूस विकतील, याची वाट पाहत आहेत.

मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी, भारतीय कापसाची होणारी निर्यात, सुतगिरण्या आणि कापड उद्योगाची मागणी यामुळं कापूस दर सुधारु शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT