Chhatrapati Sambhajinagar News: सध्या राज्यात राबविल्या जात असलेल्या महारेशीम अभियानाच्या माध्यमातून २५ हजार एकर क्षेत्रावर तुती लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रेशीम विभाग, कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला हे उद्दिष्ट विभागून देण्यात आले आहे. .महारेशीम अभियान राबविण्याचा निर्णय झाल्यानंतर रेशीम विस्तारासाठी केवळ रेशीम विभागच नाही तर महसूल, ग्राम विकास, कृषी, सामाजिक वनीकरण यासह इतरही विभागाचे यामध्ये सहकार्य घेण्याचं ठरविले गेले. सर्व विभागाच्या परस्पर सहकार्यातून राज्यात रेशीम उद्योगासाठी च्या तुती क्षेत्र विस्ताराचे नियोजन केल्या गेलं. यंदा महा रेशीम अभियान १० फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान राबविले जात आहे. .MahaReshim Abhiyan 2026: महारेशीम अभियान राबविण्यास शासनाची मंजुरी.या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील पाच विभागांतर्गत रेशीम विभागाला ८०३५ एकर, कृषी विभागाला ८९०० एकर तर जिल्हा परिषदेच्या विभागाला ८०६५ एकर असे एकूण २५ हजार एकर तुती क्षेत्र विस्ताराचे उद्दिष्ट राज्यासाठी ठेवण्यात आले आहे. सर्वाधिक उद्दिष्ट मराठवाड्याला देण्यात आला असून त्या पाठोपाठ पुणे, अमरावती, नागपूर, नाशिक आदी विभागांना क्रमाने उद्दिष्ट दिले आहे.अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या हाताने हिरवा झेंडा दाखवून महा रेशीम अभियानाला सुरुवात करण्यात आली. .Mahareshim Abhiyan: ‘महारेशीम अभियान २०२६’ ला सुरुवात.परंतु अभियान सुरू झाल्यापासून आतापर्यंतचा आढावा घेता रेशीम विभाग वगळता कृषी विभाग व जिल्हा परिषदेचा विभाग यांचं महा रेशीम अभियान यशस्वी होण्यातील योगदान दिसत नसल्यातचे आहे. अजून महरेशीम अभियान राबविण्यासाठी अवधी असला तरी शेतकऱ्यांच्या फायद्याचा मानला गेलेला रेशीम उद्योग विस्तारण्यासाठी किती प्रामाणिक प्रयत्न होतील हा खरा प्रश्न आहे..मराठवाड्यात सर्वाधिक उद्दिष्टराज्यातील पाच विभागाच्या तुलनेत सर्वाधिक १० हजार २५० एकरावर तुती लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. राज्याच्या एकूण तुती क्षेत्राचा विचार करता आताच्या घडीला मराठवाडा राज्यात अग्रेसर असून बीड जिल्ह्यात सर्वाधिक तुती लागवड व रेशीम उद्योग विस्तारलेला आहे..मराठवाड्यातील जिल्हानिहाय तुती लागवड उद्दिष्ट (एकरमध्ये)छत्रपती संभाजीनगर ११००जालना ११५०परभणी ११००हिंगोली ७५०नांदेड १०००लातूर ११००धाराशिव १९००बीड २१५०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.