शेतकरी नियोजन । पीक : दोडकाशेतकरी : ज्ञानेश्वर मुकुंद ढेरे गाव : मु पो अर्जुनसोंड, ता. मोहोळ, जि. सोलापूरएकूण शेती : १० एकर शेतीदोडका क्षेत्र : ३० गुंठे.सोलापूर जिल्ह्यातील अर्जुनसोंड (ता. मोहोळ) या गावच्या शिवारात ज्ञानेश्वर मुकुंद ढेरे यांची एकूण १० एकर शेती आहे. अर्जुनसोंड हा प्रामुख्याने ऊसपट्टा म्हणून ओळखला जात असला तरी ढेरे हे ऊस पिकासोबतच पपई, टोमॅटो, भेंडी, कलिंगड, मिरची अशी पिके घेत असतात. सध्या त्यांच्याकडे ६ एकर क्षेत्रावर ऊस आहे. मागच्या वर्षी त्यांनी उच्चतंत्रज्ञानावर आधारित ऊस लागवड करून एकरी ९० टन उच्चांकी उत्पादन घेतले होते..Ridge Gourd : शुगर आणि वजनही कमी करण्यासाठी आहे दोडक्याची भाजी मस्त.२ एकर क्षेत्रावर कलिंगड आणि मिरचीची लागवड आहे. त्याशिवाय दोडक्याची ३० गुंठे क्षेत्रावर लागवड केली आहे. उत्तम नियोजनातून दोडका पीक फायदेशीर ठरत आहे. शेती कामामध्ये वडील मुकुंद ढेरे, आई सुरेखा ढेरे, भाऊ विश्वामित्र, वहिनी मनिषा आणि पत्नी भाग्यश्री यांची मोलाची साथ मिळते. त्याशिवाय दोडका शेतीसाठी त्यांना लांबोटी येथील प्रगतिशील शेतकरी प्रमोद चट्टे यांचे मार्गदर्शन मिळते..दोडका व्यवस्थापनातील ठळक बाबीदोडका लागवडीसाठी सुधारित वाणाची निवड केली.लागवडीसाठी बी आणून खासगी रोपवाटिकेतून रोपे तयार करून घेतली.लागवडीसाठी निचरा होणाऱ्या जमिनीची निवड केली. तिथे चांगली मशागत केल्यानंतर बेसल डोस मिसळला. बेसल डोसमध्ये एकरी डीएपी १०० किलो, २४-२४-० मिश्रखत ५० किलो, सूक्ष्म अन्नद्रव्ये ५० किलो आणि गंधक १० किलो आणि निंबोळी पेंड यांचा समावेश होता.वाफ्यावर ठिबकची लॅटरल पसरून घेतल्यानंतर मल्चिंग पेपर अंथरून घेतला. त्यावर छिद्रे पाडून रोपांची लागवड केली..Bitter Gourd Farming: कारल्यामध्ये पीक संरक्षण, अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर.बेडवर साधारण दोन ओळींतील अंतर ६ फूट आणि दोन रोपांतील अंतर २ फूट ठेवून लागवड केली.लागवडीनंतर रोपांना पाण्याची आळवणी दिली. तसेच लागवडीनंतर तिसऱ्या दिवशी दोडका रोपांना १९ः१९ः१९, ह्युमिक अॅसिड आणि १२ः६१ः० यांच्या एक दिवसाचे अंतर ठेवून दोन आळवण्या केल्या.आळवण्यानंतर १२ व्या दिवसापासून ड्रीपमधून विद्राव्य खत व्यवस्थापन सुरू केले.त्यामध्ये वाढीच्या अवस्थेतील १५ ते ३० दिवसांनंतर १९ः१९ः१९ हे मिश्रखत ५ किलो या प्रमाणात ३ वेळा दिले..पुन्हा ५ दिवसांनी एकदा असे १९ः१९ः१९ मिश्रखत १५ किलो प्रमाणात खत दिले.त्यानंतर ३० ते ४५ दिवसांमध्ये सेटिंग अवस्थेवेळी १२ः६१ः० मिश्रखत ५ किलो तीन वेळा आणि १३ः४०ः१३ मिश्रखत ५ किलो याप्रमाणे आलटून-पालटून ठिबकद्वारे सोडले.त्यानंतर ४५ ते ६० दिवसांमध्ये फळधारणा अवस्थेत १२ः६१ः० मिश्रखत ४ किलो आणि १३ः०ः४५ हे मिश्रखत ५ किलो सोडले.त्याशिवाय या डोसच्या आधी लागवडीनंतरच्या पहिल्या २५ दिवसांत मॅग्नेशिअम सल्फेट ५ किलो, कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो आणि बोरॅान २५० ग्रॅम यांचा दहा दिवसांतून एक डोस दिला..Tomato Bitter Gourd Farming : टोमॅटो-कारले पीक पद्धतीचे अवगत केले तंत्र .त्याशिवाय दर पंधरा दिवसांतून १ वेळा २ किलो सूक्ष्म अन्नद्रव्याचा डोस दिला.पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी ह्युमिक अॅसिड ५०० ग्रॅम या प्रमाणे १५ दिवसांतून एकदा दिले.दोडक्यामध्ये काही ठरावीक किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव होतो, त्यावर त्यावर लक्ष ठेवून कीडनाशकांच्या (कीटकनाशक आणि बुरशीनाशकाच्या) फवारण्या घेतल्या.त्याशिवाय १५ ते २० पिवळे चिकट ट्रॅप लावले.तसेच ८ ते १० फळमाशीचे ट्रॅप लावून घेतले. त्यामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव कमी राहतो. फळे वेडेवाकडी होणे टाळले जाते.सध्या दोडक्याची तोडणी सुरू आहे..मागील पंधरवड्यातील कामेसध्या दोडक्याची एकदिवसाआड तोडणी सुरू आहे. दर तिसऱ्या दिवशी खते देत आहे. वाफसा पाहून सिंचनाचे नियोजन केले जात आहे. आतापर्यंत २ टन दोडका उत्पादन मिळाले असून, त्याची विक्री सोलापूरच्या स्थानिक बाजारातच केली..पुढील १५ दिवसांतील नियोजनदोडका तोडणी चालू राहणार आहे. तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर राहणार आहे. त्यात १२ः६१ः० आणि १३ः०ः४५, ०ः५२ः३४ ही खते आलटून-पालटून देण्याचे नियोजन आहे. तसेच कॅल्शिअम नायट्रेट आणि बोरॅान यांचेही डोस नियमित अंतराने देणार आहे.- ज्ञानेश्वर ढेरे, ९८२२८२०८७८(शब्दांकन ः सुदर्शन सुतार).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.