Cotton Market Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : शेतकऱ्यांकडून निम्म्या कापसाची विक्री; दर वाढतील का?

जागतिक पातळीवर सध्या महागाई वाढली आहे. तर रशिया आणि युक्रेन युध्दामुळे युरोपातून मागणी कमी झाली.

Anil Jadhao 

Cotton Price : देशातील एकूण कापूस उत्पादनापैकी (Cotton Production) निम्मा कापूस बाजारात आला. शेतकऱ्यांनी ऑक्टोबर ते फेब्रुवारी या पाच महिन्यांमध्ये १६० लाख गाठी कापूस विकला.

तर होळीनंतर शेतकरी कापूस विक्री वाढवतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. आज देशातील बाजारात कापूस आवक (Cotton Arrival) घटली होती. मात्र दरातही नरमाई दिसून आली.

देशातील कापूस उत्पादन यंदा ३२१ लाख गाठींवर स्थिरावण्याचा अंदाज काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला. पण भारताची कापूस निर्यात यंदा घटण्याचा अंदाज आहे. मागील हंगामात भारताने ४३ लाख गाठी कापसाची निर्यात केली होती.

पण यंदा निर्यात ३० लाख गाठींवर स्थिरावण्याचा अंदाज आहे. तर भारतातून फेब्रुवारीपर्यंत केवळ ८ लाख गाठी कापसाची निर्यात झाल्याचे कापूस निर्यातदारांनी सांगितले.

काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने यंदा देशातील कापूस उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त केला. पण तरी काही व्यापारी संस्था आणि उद्योग यंदा उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा जास्त असल्याचं सांगत आहेत.

यंदा गेल्यावर्षीपेक्षा जास्त उत्पादन झाले तरी निर्यातमात्र निचांकी पातळीवर स्थिरावेल. यंदा ऑक्टोबर ते फेब्रुवारी या पाच महिन्यांच्या काळात केवळ ८ लाख गाठी कापूस निर्यात झाला. यावरून यंदा निर्यातीची गती कमी आहे, याची कल्पना येते.

जागतिक पातळीवर सध्या महागाई वाढली आहे. तर रशिया आणि युक्रेन युध्दामुळे युरोपातून मागणी कमी झाली. त्यामुळे जागतिक कापूस मागणी कमी झाली. देशातील बाजारात आत्तापर्यंत १६० लाख गाठी कापसाची आवक झाली. म्हणजेच निम्मा कापूस बाजारात आला. तर गुजरातमध्ये ४५ लाख गाठी कापसाची आवक झाली.

देशातील बाजारात आज कापूस आवक काहीशी घटली होती. तर दरही नरमले होते. आज कापसाला सरासरी ७ हजार ८०० ते ८ हजार ३०० रुपये भाव मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दरात चढ उतार सुरु आहेत. पण कापूस दर जास्त नरमणार नाहीत.

कापूस सरासरी ८ हजार ५०० रुपयांच्या पातळीवर राहण्यास अनुकूल स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग टाळावे, असे आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केले.

कापूस आवक वाढण्याची आशा

देशातील सूत मागणी सध्या धीमी असल्यानं सुतगिरण्या ८० टक्के क्षमतेने सुरु आहेत. मागील महिन्यात बांगलादेशातून काही ऑर्डर्स मिळाल्या. देशातील बाजारात होळीनंतर कापूस आवक वाढण्याचा अंदाज आहे. पण कापूस खंडीचे भाव ५८ हजार रुपयांपेक्षा कमी होण्याची शक्यता नाही, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले.

भारतीय कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षा जास्त आहेत. सध्या भारतीय कापूस ६० हजार रुपये प्रतिखंडीने मिळत आहे. कापसाचे भाव जास्त असल्याने निर्यातीत अडचणी येत आहेत.
अजय शाह, सचिव, गुजकाॅट असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT