Wheat Market Agrowon
ॲग्रोमनी

Wheat Market: गव्हाची हमीभावाने खरेदी १२ टक्क्यांनी वाढली

देशातील अन्नसुरक्षेसाठी पुरेसा स्टाॅक करण्यासाठी सरकारला यंदा गहू खरेदी वाढवावी लागणार आहे. केंद्राने आतापर्यंत १११ लाख टन गहू खरेदी केली आहे.

Team Agrowon

Wheat Rate : देशातील अन्नसुरक्षेसाठी पुरेसा स्टाॅक करण्यासाठी सरकारला यंदा गहू खरेदी वाढवावी लागणार आहे. केंद्राने आतापर्यंत १११ लाख टन गहू खरेदी केली आहे. यंदाची खरेदी गेल्यावर्षीपेक्षा १२ टक्क्यांनी अधिक आहे. सध्या मध्य प्रदेश, हरियाना आणि उत्तर प्रदेशात खरेदी सुरु आहे.

यंदा देशातील महत्वाच्या गहू उत्पादक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. पावसाने अनेक भागांमध्ये काही दिवस हजेरी लावली. त्यामुळे गहू काढणीच्या कामांना उशीरा सुरुवात झाली. पीक पावसात ओले झाल्याने शेतकरी वाळवूनच बाजारात आणत आहेत.

त्यामुळे बाजारातील आवक काहीशी धिमी दिसते. पंजाबमध्ये दरवर्षी बैसाखी सणानंतर आवक होत असते. पंजाबमधील बाजारात सध्या ६ ते ७ लाख टनांच्या दरम्यान आवक होत आहे. ही आवक बैसाखीनंतर १५ लाख टनांच्या दरम्यान पोचेल, असे मिलर्सनी सांगितले.

सरकारने आतापर्यंत १११ लाख टन गहू खरेदी केला. मागील हंगामात याच काळातील खरेदी जवळपास १० लाख टन होती. म्हणजेच यंदाची खेरदी १२ टक्क्यांनी अधिक आहे. सध्या आतापर्यंत १२ लाख शेतकऱ्यांचा गहू खरेदी करण्यात आला.

या शेतकऱ्यांनी २३ हजार ६६३ कोटी रुपये मिळाले. केंद्र सरकारने यंदा ३४१ लाख टन गहू खरेदीचे उद्दीष्ट ठेवले होते. यापैकी पंजाबमध्ये १३२ लाख टनांची खरेदी होणार आहे. तर हरियानात ७५ लाख टन, मध्य प्रदेशात ८० लाख टन आणि उत्तर प्रदेशात ३५ लाख टनांची खेरदी होणार आहे.

मध्य प्रदेशातील गहू खरेदी आतापर्यंत गेल्यावर्षीपेक्षा ६७ टक्क्यांनी अधिक झाली. १९ एप्रिलपर्यंत मध्य प्रदेशात ३२ लाख टनांची खेरदी झाली, तर मागील हंगामात याच काळातील खरेदी २० लाख टनांची खरेदी झाली होती.

हरिनातील खरेदी २१ टक्क्यांनी वाढून ३८ लाख टनांची खेरदी झाली, तर मागील हंगामातील खरेदी ३२ लाख टन होती. उत्तर प्रदेशातील खेरदी ४८ टक्क्यांनी वाढून ६३ हजार टनांवर वाढली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nandini River Conservation: नंदिनी नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी राबले हात

Social Awareness: सुशिक्षित समाजातील अंधश्रद्धा अधिक धोकादायक : माजी खासदार कुमार केतकर

Ahilyanagar MLAs: अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

Agriculture Awareness Campaign: संतुलित खत वापरासाठी कृषी विज्ञान केंद्राची जनजागृती मोहीम

Farm Loan Waiver Controversy: अटी, शर्तींचे जाळे टाकून शेतकऱ्यांची फसवणूक; कर्जमाफीवर विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT