Cotton Market Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market: कापूस वायद्यांमध्ये चांगली सुधारणा; बाजार समित्यांमध्ये थोडी नरमाई

Team Agrowon


Cotton Price : पुणेः देशातील बाजारात कापूस दर मागील आवडाभरापासून वाढलेले आहेत. आज, म्हणजेच ११ ऑगस्ट रोजी वायद्यांमध्ये कापसाने ६० हजारांचा टप्पा पार केला. तर बाजार समित्यांमध्ये मात्र आज काहीसे चढ उतार दिसले. पण चालू महिन्यात कापूस दरात किमान ५०० रुपयांची वाढ कायम राहू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. 

कापसाला वाढलेली मागणी आणि घटत चालेली आवक यामुळे दरात वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील वायद्यांमध्येही सुधारणा झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे पुन्हा ८६ सेंटवर पोचले होते. तर देशातील वायद्यांनी ६० हजार रुपयांचा टप्पा गाठला होता. एमसीएक्सवरील कापसाचे वायदे दुपारपर्यंत १६० रुपयांनी वाढले होते. कापूस वायद्यांनी आज ६० हजार ३८० रुपयांवर पोचले. आज वायदे बाजाराचा आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या सत्रात चढ उतार दिसू शकतात. मागील चार महिन्यांमध्ये कापूस भावाने खूपच कमी वेळा ६० हजारांचा टप्पा पार केला.

राज्यानिहाय बाजाराचा विचार करता आज गुजरातमध्ये सर्वाधिक भाव मिळाला. गुजरातमधील सरसरी भावपातळी आत ६ हजार ७०० ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान होते. तर कर्नाटकातील भावही ६ हजार ५०० ते ७ हजार ८०० रुपये होता. महाराष्ट्रात मात्र ६ हजार ५०० ते ७ हजार ६५० रुपयांचा भाव मिळाला. राज्यनिहाय कापूस आवक आणि दरात फारशी तफावत आज जाणवली नाही.

बाजार समित्यांमधील भावातही मागील आठवडाभरात ५०० ते ७०० रुपयांची वाढ झाली. विशेष म्हणजे ही वाढ चालू आठवड्यात कायम आहे. सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार ७०० रुपयांचा भाव मिळाला. कमाल भाव अनेक बाजारांमध्ये ७ हजार ५०० रुपयांच्या पुढे आहेत. कापसाच्या भावातील ही वाढ पुढील काळातही टिकून राहू शकते. तसेच दरात काहीसे चढ उतार दिसतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील कापूस लागवड आतापर्यंतही काहीशी पिछाडीवर आहे. त्यातच ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत बहुतांशी भागांमध्ये पावसाने ओढ दिली. देशातील महत्वाच्या कापूस उत्पादक महाराष्ट्र, गुतरात, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान या भागातील कापूस पिकांना पाण्याची टंचाई जाणवत आहे. यामुळे कापूस पिकावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच सध्या सणांमुळे कापसाला मागणी वाढली. सुताच्या भावातही वाढ झाली आहे. परिणामी कापूस दरातील सुधारणा पुढील काळातही कायम राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weekly Weather : राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Retreating Monsoon : परतीचा पाऊस थांबायचे नावच घेईना

Khandesh Rain : पावसामुळे खानदेशातील प्रमुख नद्या झाल्या प्रवाही

Crop Damage : शिरूरमधील शेतकऱ्यांचे वादळ, पावसामुळे पिकांचे नुकसान

Maharashtra Politics : छत्रपती शिवरायांचे विचार घेऊनच काँग्रेसचा लढा

SCROLL FOR NEXT