Lasuan Rate Agrowon
ॲग्रोमनी

Lasun Rate : लसणाचे भाव वधारले, प्रतिकिलो दोनशे रूपयांकडे वाटचाल

Navi Mumbai Apmc Market : वाशी बाजारसमितीत लसूण, कांद्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. एप्रिलपासून आवक घटली असून भाव वधारले आहेत. बाजारात आधी लसूण प्रतिकिलो ९० ते १२० रुपयांनी मिळत होता.

Team Agrowon

Vashi News : वाशी कृषी उत्पन्न बाजारसमितीत लसूण, कांद्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. एप्रिलपासून आवक घटली असून भाव वधारले आहेत. बाजारात आधी लसूण प्रतिकिलो ९० ते १२० रुपयांनी मिळत होता.

आता ११० ते १५० रुपयांवर गेला आहे. तसेच पुढील काळात लसूण २०० पार करेल, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

एपीएमसी बाजारात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नवीन ओल्या लसणाची आवक होण्यास सुरुवात होते. त्यामुळे नवीन लसूण बाजारात दाखल होताच दर आवाक्यात येतात; मात्र यंदा लसूण लागवडीखालील क्षेत्र कमी असल्याने उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे लसूण महागले आहे.

दरवाढीची प्रमुख कारणे

जानेवारी-फेब्रुवारीमध्ये २०-२५ गाड्या आवक होती. एप्रिलपासून आवक कमी होत आहे. शुक्रवारी बाजारात अवघ्या १२ गाड्यांमधून २,५८३ गोणी लसूण दाखल झाला आहे.

गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात ९० ते १२० रुपयांपर्यंत उपलब्ध असणाऱ्या लसणाच्या दरात २०-३० रुपयांनी दरवाढ झाली असून, आता ११० ते १५० रुपयांवर दर गेले आहेत.

२०१७ मध्ये लसणाच्या दराने उच्चांक गाठला होता. प्रतिकिलो लसणाचे दर २०० ते २५० रुपयांवर गेले होते. पुढील काळात लसूण २०० पार करेल, अशी शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT