Onion Storage
Onion Storage  Agrowon
ॲग्रोमनी

उन्हाळ कांदा साठवण करण्यावर शेतकऱ्यांचा भर

ॲग्रोवन वृत्तसेवा

खामखेडा, जि. नाशिक : सध्या कसमादे भागात उन्हाळ कांदा (Summer Onion) काढणीला गती आली आहे. चालू वर्षी कांद्याची विक्रमी (Onion record) लागवड झाली होती. बंपर उत्पादन मिळेल, अशी आशा असताना, अवकाळी पाऊस, (Unseasonal rain,) वातावरणातील बदल आणि विजे (Electricity) अभावी कांदा उत्पादनावर (Onion growers) मोठा परिणाम झाला आहे. काही शेतकऱ्यांचे ५० टक्क्यांपर्यंत उत्पादन कमी येत आहे. त्यातच सध्या कांद्याला नसलेल्या अपेक्षित बाजारभावामुळे कांदा उत्पादक (Onion Productive) शेतकरी कांदा साठवणुकीवर भर देत आहे.
मार्चअखेर कांद्याला सरासरी आठशे ते नऊशे रुपये भाव मिळत आहे.

यामुळे शेतकरी कांदा (Farmer onion) साठवणूक करीत आहेत. मातीमोल दरात कांदा देण्यापेक्षा साठवण करण्यास अधिक पसंती देत असल्याने सध्या देवळा तालुक्यातील खामखेडासह सावकी, विठेवाडी, पिळकोस, बागडू, भादवण, विसापूर तसेच सटाणा व मालेगाव परिसरात कांदा साठवणूक करतानाचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे.
मागील वर्षी रोपाच्या टंचाईने कांदा लागवड (Onion Orchard) कमी होती. उन्हाळी कांद्याचे (Summer Onion) उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. या वर्षी विक्रमी लागवड होऊनही कांद्याच्या उत्पादनात सर्वत्र घट झाली आहे. गिरणा परिसरातील खामखेडा, भऊर, बगडू, पिळकोस, बेज, भादवण, विसापूर या परिसरात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

दरवर्षी सर्वसाधारण शेतकरी दोनशे ते तीनशे क्विंटल कांद्याची चाळीत साठवणूक करीत होता. मात्र या वर्षी उत्पादनातील घट, सध्या मिळत असलेला अल्पसा बाजारभाव (Market bhav) या गोष्टींचा विचार करून शेतकरी साठवणूक करीत आहेत.

सध्या अल्पसा बाजारभाव व घटलेल्या उत्पादनामुळे अनेक शेतकरी कांदा विक्रीपेक्षा साठवणुकीवर भर देत आहेत. वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे दोन पैसे मिळतील, अशी आशा असल्याने शेतकरी कांद्याची साठवणूक करीत आहे.
नामदेव बच्छाव, कांदा उत्पादक शेतकरी, खामखेडा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahanand Dairy : ‘महानंद’ अखेर ‘एनडीडीबी’कडे

Summer Heat : हापूसवर वाढत्या उन्हाचा परिणाम

Farewell Ceremony : प्रशासकीय जंजाळात अडकले शेतकऱ्यांचे कृषी खाते

Water Scarcity : भाजीपाल्याची वाढ खुंटली; नवीन बागा वाळल्या

Mango Market : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वाशीत ९० हजार आंबा पेट्या

SCROLL FOR NEXT