Marigold Producers
Marigold Producers Agrowon
ॲग्रोमनी

Marigold Producers : दर कोसळल्याने झेंडू उत्पादकांना फटका

टीम ॲग्रोवन

परभणी ः दिवाळी लक्ष्मीपूजनानिमित्त सोमवारी (ता. २४) परभणी येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केट (Fruit, Vegetables Market Parbhani) तसेच शहरात मोठ्या प्रमाणावर झेंडू्च्या फुलांची आवक झाली होती. दुपारनंतर दरात मोठी घसरण झाली. मोफत देऊनही कुणी घेण्यास तयार होत नसल्यामुळे फुले फेकून देण्याची वेळ आली. परिणामी, झेंडू उत्पादकांना (Flower Production) मोठा आर्थिक फटका बसला. अनेक शेतकऱ्यांना मजुरी तसेच वाहतूक खर्चांचा भुर्दंड बसला.

दसरा, दिवाळी सणासाठी झेंडू फुलांची मागणी लक्षात घेऊन परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील शेतकरी कमी अधिक क्षेत्रावर झेंडूचे उत्पादन घेत आहेत. परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांच्या मुख्यालयासह तालुक्यांची मोठ्या बाजारपेठांच्या ठिकाणी झेंडू विक्रीसाठी नेतात. यंदाच्या दसऱ्याला अनेक शेतकऱ्यांच्या झेंडू फुलांना प्रतिकिलो ३० ते ५० रुपये दर मिळाले. त्याचप्रमाणे दिवाळीला देखील चांगले दर मिळतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती.

परभणी येथील बाजारपेठेत रविवारी (ता. २३) सायंकाळपासून स्थानिक परिसर तसेच हिंगोली जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून झेंडूंची आवक सुरू झाली. त्या वेळी ५० रुपये किलोपर्यंत दर होते. सोमवारी (ता. २४) सकाळी पाथरी रस्त्यावरील मार्केटमध्ये अडीच हजारांवर क्विंटल झेंडूची आवक झाली. त्यामुळे दर प्रतिकिलो १० ते ५ रुपयांपर्यंत घसरले. अनेक शेतकऱ्यांकडून मार्केटमध्ये खरेदी करण्यात आली नाही. त्यामुळे अनेकांनी शहरातील बाजारपेठेत स्वतः विक्री केली. परंतु दुपारनंतर ५ रुपये किलोपर्यंत दर कमी होऊनही ग्राहकांकडून मागणी नव्हती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मोफत फुले वाटण्यास सुरुवात केली. परंतु मोफत देऊन सुद्धा घेण्यास कुणी तयार होत नसल्यामुळे झेंडू रस्त्यावर फेकून द्यावा लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शहरातील रस्त्यांवर झेंडूचे ढीग दिसत होते.

प्रतिक्रिया ----

दसऱ्याला चांगले दर मिळल्यामुळे झेंडू व्यवस्थापनावर खर्च केला. सोमवारी सकाळी मार्केटमध्ये विकले नाहीत म्हणून परभणी शहरात स्वतः विक्रीस बसलो, परंतु दुपारनंतर दरात खूप कमी झाले. ७ ते ८ क्विंटल झेंडू फेकून द्यावा लागला. मजुरी, वाहतुकीचा खर्चदेखील निघाला नाही.

- आकाश काळदाते,

ब्राह्मणगाव, ता. परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

Weekly Weather : मॉन्सूनच्या आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

SCROLL FOR NEXT