Sugar Agrowon
ॲग्रोमनी

Sugar : देशांतर्गत बाजारात साखरेला मागणी स्थिर

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर सध्या मिठाई उद्योग, शीतपेय उद्योगातूनही साखरेला फारशी मागणी नाही. यामुळे कारखान्यांना साखर विक्री करण्यासाठी धडपडावे लागत आहे.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : सध्या देशांतर्गत बाजारात साखरेला मागणी (Sugar Demand In Domestic Market) कमी असली, तरी जुलैच्या उत्तरार्धापासून सण सुरू होत असल्याने साखरेला मागणी (Sugar Demand) वाढण्याची आशा साखर उद्योगाला (Sugar Industry) आहे. केंद्राने नुकताच जुलै महिन्यासाठी २१ लाख टन साखरेचा कोटा कारखान्यांना खुला केला आहे. हा कोटा जून इतकाच आहे. तर गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत एक लाख टनांनी कमी आहे.

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर सध्या मिठाई उद्योग, शीतपेय उद्योगातूनही साखरेला फारशी मागणी नाही. यामुळे कारखान्यांना साखर विक्री करण्यासाठी धडपडावे लागत आहे. पावसाळ्यात सार्वजनिक कार्यक्रमांवरही मर्यादा येत असल्याने विक्रीत घट आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दर असले तरी राष्ट्रीय पातळीवर मात्र मागणी फारशी नसल्याने दर वाढण्यास तयार नाहीत.

साखर उद्योगातील व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या देशाचा साखरेचा खप २२ ते २३ लाख टन आहे. साखरेचे दर ३२०० ते ३३०० रुपये प्रति टन आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे दर स्थिरच आहेत. देशातील साखर हंगाम संपला असून, बहुतांश कारखाने शिल्लक साखर संपवण्याच्या तयारीत आहेत. केंद्र सरकार खुल्या निर्यातीला परवानगी देत नसल्याने बहुतांश कारखान्यांचा कल सध्या देशांतर्गत बाजारातच साखर विक्रीकडे आहे.

ज्या साखर कारखान्यांची साखर जादा प्रमाणात शिल्लक आहे ते कारखाने मात्र येथून पुढील काळात मागणी न आल्यास एमएसपीपेक्षा कमी दरात साखर कारखाने विक्री करतील, अशी भीती साखर उद्योगाला आहे. केंद्राने मात्र गेल्या वर्षीपेक्षा यंदा एक लाख टन कोटा कमी देऊन साखर कारखान्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे.

शिल्लक साखरेचा मोठा ताण कमी

जुलैच्या उत्तरार्धापासून अनेक धार्मिक सण सुरू होत असल्याने या काळात साखरेला मागणी वाढेल असा अंदाज केंद्राचा आहे; मात्र सध्या मागणी नसल्याने केंद्रानेही यंदा कोट्यामध्ये एक लाख टनाची घट केली आहे. देशात यंदा उच्चांकी साखर उत्पादन झाले असली जवळपास १०० लाख टन साखर देशाबाहेर गेल्याने शिल्लक साखरेचा मोठा ताण कमी झाल्याचे साखर कारखान्याच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यांपासून देशांतर्गत बाजारात साखरेचे दर अपवाद वगळता स्थिरच असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT