Tur Market Agrowon
ॲग्रोमनी

Tur Market: तुरीचे भाव तेजीत असूनही लागवड १८ टक्क्यांनी पिछाडीवर

Tur Rate : देशात सध्या तुरीचे भाव तेजीत आहेत. सरकारनेही हमीभावाने तूर खेरदीवरील बंधनं काढली, हमीभावातही वाढ केली.

Team Agrowon

Tur Bazar : पुणेः देशात सध्या तुरीचे भाव तेजीत आहेत. सरकारनेही हमीभावाने तूर खेरदीवरील बंधनं काढली, हमीभावातही वाढ केली. पण देशातील तुरीची लागवड गेल्यावर्षीपेक्षा कमीच दिसते. देशात आतापर्यंत २७ लाख हेक्टरवर तुरीची लागवड झाली. म्हणजेच गेल्यावर्षीपेक्षा तुरीखालील क्षेत्र १८ टक्क्यांनी कमी आहे.

देशात सध्या तुरीचा तुटवडा जाणवत आहे. देशातील बाजारात तुरीच्या दरातील तेजी कायम आहे. तुरीला सध्या ९ हजार ते १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशात यंदा तुरीचा पुरवठा कमी आहे. पुरवठ्यात यंदा १७ लाख टनांची तूट असल्याचे जाणकारांनी स्पष्ट केले. तुरीचा पुरवठा कमी असल्याने दरातील तेजी पुढील काळातही कायम राहण्याचा अंदाज आहे. सध्या तुरीला प्रतिक्विंटल ९ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे.

ऐन लागवडीच्या काळात तुरीच्या दरात तेजी असल्याने शेतकरी तूर लागवडीला प्राधान्य देतील असे वाटत होते. त्यातच सरकारने हमीभावाने तूर खेरदीवरील मर्यादा काढली होती. म्हणजेच शेतकरी आपला संपूर्ण माल हमीभावाने सरकारला विकू शकतात. पण जून महिन्यात लांबलेल्या पावसाने तूर लागवड वाढीच्या मनसुब्यावर पाणी फेरले.

कडधान्याचा पेरा यंदा जवळपास १० टक्क्यांनी घटल्याचे दिसते. कडधान्याचा पेरा ८६ लाख हेक्टरपर्यंतच पोचला. कडधान्यामध्ये तुरीच्या लागवडीत झालेली घट जास्त आहे. तुरीखालील क्षेत्र १८ टक्क्यांनी घटले. मुगाची लागवडही दोन टक्क्यांनी कमी झाली असून उडदाचे क्षेत्रही जवळपास १० टक्क्यांनी घटले आहे. तुरीची लागवड आतापर्यंत २७ लाख हेक्टरवर पोचली. तूर उत्पादनात महत्वाच्या महाराष्ट्रात लागवड सात टक्क्यांनी पिछाडीवर असून ९ लाख ६० हजार हेक्टरवर पोचली. तर कर्नाटकातील तूर लागवड तब्बल ४१ टक्क्यांनी कमी आहे.

देशातील कोरवाहू तूर लागवडीचा कालावधी आता संपला. देशात जवळपास ९५ टक्के तूर पीक कोरडवाहू आहे. त्यामुळे शेतकरी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तूर लागवड करण्याची शक्यता खूपच कमी आहे. परिणामी यंदा तुरीखालील क्षेत्र गेल्यावर्षीपेक्षा कमीच राहू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT