Cotton Market
Cotton Market Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : कापूस उत्पादन १५ वर्षातील निचांकी पातळीवर!

Team Agrowon

Cotton Update : देशात यंदा कापूस उत्पादन जास्त असल्याचे उद्योगांकडून सांगण्यात येत होते. पण मागील तीन महिन्यांमध्ये कापूस उत्पादनाचे अंदाज कमी होत गेले. काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने अर्थात सीएआने कापूस उत्पादनाच्या अंदाज पुन्हा एकदा कपात केली आहे.

देशातील उत्पादन गेल्या १५ वर्षातील निचांकी पातळीवर पोचले. देशात यंदा २९८ लाख गाठी कापूस उत्पादन झाल्याचे सीएआयने म्हटले आहे. या अंदाजामुळे कापूस बाजाराला आधार मिळायला हवा. पण असं होताना दिसत नाही.

देशातील कापूस उत्पादनात यंदाही घट झाल्याचं शेतकरी अगदी सुरुवातीपासून सांगत होते. पण यंदा उत्पादन चांगलं असल्याची रि उद्योगांकडून ओढली जात होती. उद्योगांनी हंगामाच्या सुरुवातीला देशातील कापूस उत्पादन यंदा ३७५ लाख गाठींवर पोचेल, असा अंदाज व्यक्त केला. त्यानंतर ३६५ लाख गाठींचा अंदाज दिला.

देशातील कापूस पिकाला पाऊस आणि कीड-रोगाचा फटका बसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सीएआयकडून दर महिन्यातील अंदाजात कपात करण्यात आली. मार्च महिन्यातील अंदाज कापूस उत्पादन ३०३ लाख गाठींवर स्थिरावल्याचे सीएआयने म्हटले होते.

पण एप्रिलच्या अंदाज पुन्हा कपात करून २९८ लाख गाठींवर आणला. म्हणजेच २००८-०९ नंतर सर्वात कमी कापूस उत्पादन चांलू हंगामात झालं. म्हणजेच यंदाच्या हंगामात गेल्या १५ वर्षांतील निचांकी उत्पादन झाले.

सीएआयने महाराष्ट्र आणि तेलंगणातील कापूस उत्पादनाचा अंदाज २ लाख गाठींनी कमी केला. तर तमिळनाडूत ५० हजार तर ओडिशात १५ हजार गाठींनी कपात केली. तर कापूस वापर ३११ लाख गाठींवर पोचेल, असेही म्हटले आहे. गेल्या हंगामात देशात ३१८ लाख गाठी कापूस वापर झाला होता. म्हणजेच यंदा कापूस वापर ७ लाख गाठींनी कमी होणार आहे.

तर उत्पादनात गेल्या हंगामाच्या तुलनेत ९ लाख गाठींनी घट झाली. म्हणजेच भारताच्या कापूस वापरातील घट उत्पादनातील घटीपेक्षा कमी आहे. भारताचा कापूस वापर यंदाही चांगला होणार आहे.

देशातील बाजारात ३० एप्रिलपर्यंत २२४ लाख गाठी कापूस आल्याचा अंदाज सीएआयने व्यक्त केला. म्हणजेच एक मे पर्यंत ६४ लाख गाठी कापूस बाजारात येणे बाकी होते. यापैकी शेतकऱ्यांकडे ५० ते ५५ लाख गाठी कापूस असू शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत होते. कापसाची बाजारातील आवक आजही जोमात सुरु आहे.

कापूस निर्यातही यंदा निम्म्यापेक्षा कमी होणार आहे. गेल्या हंगामात ४३ लाख गाठी कापूस निर्यात झाली होती. ती यंदा २० लाख गाठींवरच स्थिरावेल, असा अंदाज सीएआयने व्यक्त केला. त्यापैकी १२ लाख गाठींची निर्यातही झाल्याचे सीएआयने स्पष्ट केले.

देशातील कापूस उत्पादनाने १५ वर्षांतील निचांकी टप्पा गाठला. त्यामुळे कापसाला चांगाल भाव मिळेल अशी अपेक्षा होती. पण बाजारात दरावरील दबाव आजही कायम होता. कापसाला सरासरी ७ हजार ४०० ते ७ हजार ९०० रुपये दर मिळाला. बाजारातील कापूस आवकेचा दबाव असेपर्यंत दरही दबावात दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT