बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याकडून प्रतिटन एकरकमी ३,६१४ रुपये ऊसदर जाहीरहा दर राज्यातील सर्वाधिक दर असल्याचे कारखान्याकडून सांगण्यात आले आहेशेतकरी संघटनांच्या ऊस दराच्या आंदोलनानंतर अवघ्या आठवडाभरात दरात बदल.Bidri Factory Sugarcane Price: बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने चालू २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी सुधारित ऊस दर जाहीर केला आहे. त्यांनी प्रतिटन एकरकमी ३,६१४ रुपये ऊसदर देण्याचा निर्णय घेतला आहे. हा दर राज्यातील सर्वाधिक दर असल्याचे कारखान्याकडून सांगण्यात आले आहे. .याआधी आठ दिवसांपूर्वी बिद्री कारखान्याने प्रतिटन ३,४५२ रुपये विनाकपात पहिली उचल जाहीर केली होती. पण हा दर एफआरपीपेक्षा कमी असल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे होते..Bidri Karkhana Sugarcane Price: 'बिद्री'च्या ऊसदराची उत्सुकता संपली! यंदाही उच्चांकी दर जाहीर.गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर ऊस पट्ट्यात ऊसदरावरुन आंदोलन सुरु आहे. ऊसदरावरून सोमवारी शेतकरी संघटना आणि कारखान्यांचे प्रतिनिधी यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली बैठक निष्फळ ठरली होती. बिद्री कारखान्याला ३,५५२ रुपये एफआरपी असताना त्यांनी ३,४५२ रुपये पहिली उचल जाहीर केली. हे नियमबाह्य असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केला होता. दरम्यान, बिद्री कारखान्याने आम्हाला प्रतिटन ३,६०७ रुपये एफआरपी बसत असून आम्ही त्याहून अधिक म्हणजे ३,६१४ रुपये ऊसदर जाहीर केला असल्याचे म्हटले आहे. .Sugarcane Price: ऊसदराबाबतच्या बैठकीत तोडगा नाहीच, आता कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू, राजू शेट्टींचा इशारा.याबाबत आज कारखाना कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत थेट मुंबईतून कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील सहभागी झाले होते. यावेळी उपाध्यक्ष मनोज फराकटे आणि संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी सुधारित ऊस जाहीर करण्यात आला..बिद्री साखर कारखान्याने स्थापनेपासूनच ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी एक घट्ट नाते जोडले आहे. नेहमीच उच्चांकी ऊसदर देण्याची परंपरा कायम ठेवत या वर्षीही कारखान्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या असल्याचे सांगण्यात आले आहे..Sugarcane Protest: 'स्वाभिमानी'नं ऊस तोडी बंद पाडल्या, निपाणी- मुरगूड रस्त्यावर कर्नाटकातून येणारी वाहतूक रोखली.ऊसदर जाहीर करताना के. पी. पाटील यांनी मुंबईतून बोलताना सांगितले की, “बिद्रीने आजवर शेतकऱ्यांच्या विश्वासावर चाललेली प्रगती कायम ठेवली आहे. भविष्यातही बिद्री कारखाना कोणत्याही परिस्थितीत मागे राहणार नाही.”.अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ, ऊसतोड मजूर टंचाई अशा आव्हानांनंतरही बिद्रीने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत दर निश्चित केला आहे. “शेतकऱ्यांचे पाठबळ हेच बिद्रीची ताकद आहे. याच पाठबळावर बिद्रीची यशस्वी घोडदौड पुढेही सुरू राहील. आमचे उद्दिष्ट केवळ साखर उत्पादन नव्हे, तर शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे हे आहे.” असे त्यांनी नमूद केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.